आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Says This Diwali I Have Requested The Citizens To Dedicate Message For All Our Jawans And Security Forces

सपा-बसपाच्या जाळ्यातून बाहेर पडा, उत्तर प्रदेशला ‘उत्तम प्रदेश’ करू- मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महोबा (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या जाळ्यातून बाहेर पडा आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरणासाठी या वेळी भाजपला मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशमधील नागरिकांना केले.

महोबा येथे जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशने खूप राजकारण पाहिले आहे. येथे सर्व प्रकारचे खेळ खेळून झाले आहेत. ज्यांना खेळायचे होते ते खेळले, ज्यांना काही मिळवायचे होते ते त्यांना मिळाले. आधी सपाने आणि नंतर बसपाने. आता त्यांचे जग बदलले आहे, पण तुमचे बदलले नाही. तुम्हाला पुढील १० वर्षांत उत्तर प्रदेशला ‘उत्तम प्रदेश’ बनवायचे असेल तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या जाळ्यातून बाहेर पडा.
समाजवादी पक्ष आणि बसपाने आलटून-पालटून १५ वर्षे उत्तर प्रदेशात सत्ता केली. परस्परांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हातमिळवणी केली आहे, अशी टीका करून मोदी म्हणाले की, निवडणूक येते तेव्हा दोन्ही पक्ष परस्परांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करतात, पण सत्तेवर आले की काहीच कारवाई करत नाहीत. बसपाच्या वर्षांच्या काळात सपाचा एक तरी नेता तुरुंगात गेला का? आता सपाही तोच कित्ता गिरवत आहे. हे दोन्ही पक्ष लोकांना गोंधळात टाकतात. दोन्ही पक्षांचा हा खेळ सुरूच आहे. त्यामुळे राज्याची वाट लागली आहे.

एका पक्षाला ‘कुटुंबा’ची, तर दुसऱ्याला ‘खुर्ची’ची चिंता
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जसे चित्र होते तसेच चित्र आताही आहे. एका पक्षाला आपल्या ‘कुटुंबा’ची तर दुसऱ्या पक्षाला ‘खुर्ची’ची चिंता आहे. फक्त भाजपलाच उत्तर प्रदेशची चिंता आहे. या वेळी राज्यातील नागरिकांना, विशेषत: युवकांना आपले भवितव्य ठरवायचे आहे. तुमच्या मागच्या पिढीने सपा किंवा बसपाला मते दिली असतील, पण तुम्हाला तुमच्या आणि राज्याच्या भवितव्याबद्दल चिंता असेल तर या वेळी तुम्ही भाजपचा विचार करा. उत्तर प्रदेशमधून आतापर्यंत निवडून गेलेल्या सर्व पंतप्रधानांपेक्षा जास्त काम मला करायचे आहे, असा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला.

आमच्या अडीच वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण नाही
आमच्या सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण समोर आले नाही. २०१४ मध्ये वर्तमानपत्रांची पाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी भरलेली होती, हे तुम्ही पाहिलेच आहे. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही भ्रष्टाचाराचे एक तरी प्रकरण पाहिले आहे का? असा प्रश्न विचारून मोदी म्हणाले की, देशात प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांना बळ देण्याची गरज आहे. यूपीतील भ्रष्टाचाराचा खेळ आता थांबवलाच पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...