आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi To Arrive At Own Constituency In Varanasi To Inaugurate Many Projects

मोदींच्या हस्ते आज गॅस वाहिनीचे लोकार्पण; अनेक प्रकल्पांचे होणार उद्‍घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी आपल्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते १५०० किलोमीटरच्या गॅस पाइपलाइनचे लोकार्पण केले जाणार आहे. त्याचबरोबर रेल्वे रुळासह अनेक प्रकल्पांनाही सुरुवात केली जाणार आहे.

पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांचा हा आठवा दौरा आहे. त्यांच्या हस्ते ‘ऊर्जा गंगा’ या गॅस पाइपलाइन प्रकल्पास सुरुवात होईल. त्यामुळे वाराणसीमधील जनतेला स्वयंपाकाचा गॅस त्यांच्या घरापर्यंत वाहिनीद्वारे उपलब्ध होणार आहे. प्रकल्पावर ५१ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. दोन वर्षांत ही सेवा देणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले होते. त्याच्या दोन वर्षांनंतर बिहार, झारखंड, बंगाल, आेडिशातील जनतेलाही सुविधा मिळणार आहे. वाराणशीचे प्राचीन महत्त्व लक्षात घेऊन शहराच्या स्मरणार्थ एका टपाल तिकिटाचेही त्यांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. शहरातील मुख्य मार्गाचे विस्तारीकरण कामाचे शीलापूजनही त्यांच्या हस्ते होईल. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे वाराणसी शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने दौरा महत्त्वाचा
उत्तर प्रदेशातील निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा होणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्व आले आहे. राज्यात १९९० मध्ये आघाडीवर असलेल्या भाजपला पुन्हा एकदा यश मिळेल, अशी आशा वाटते. २०१४ मध्ये भाजपचे लोकसभेत नाट्यमय पुनरागमन झाले. राज्यात लोकसभेसाठी ७८ जागी निवडणूक लढवणाऱ्या भाजपला ७१ जागी विजय मिळाला होता. त्यामुळे राजकीय विश्लेषकही चकित झाले होते. मोदींनी वडोदऱ्यात विजय होऊनही वडोदरा परत करून वाराणसीत काम करण्याची इच्छा दर्शवली होती.
बातम्या आणखी आहेत...