श्रीनगर - 1990 मध्ये काश्मीरमधून स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांचे येथे स्वागत आहे. त्यांचा तो हक्क आहे. मात्र, त्यांच्यासाठी विशेष वसाहती स्थापन करण्यास राज्यातील धार्मिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
पंडित काश्मीर समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. 1990 मध्ये काश्मीर सोडून गेलेल्या पंडितांनी परत येऊन स्थायिक होण्याचा अधिकार आहे. सामान्य नागरिक म्हणून त्यांनी येथे राहावे, असे मजलिस इतिहाद-ए- मिल्लतचे अध्यक्ष बशीर-उदइन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जमात-ए- इस्लामी, जमात-ए- अहली हदीस आणि अंजुमन-ए- शारी शियान आदी डझनभर संघटनांचा समावेश असलेली मजलिस ही संघटना आहे.
उधमपूर-कटरा रेल्वे मार्गाचे लोकार्पण
वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार्या भाविकांना थेट तीर्थस्थळी पोहोचवणारी बहुप्रतीक्षित रेल्वे शुक्रवारी सुरू होत आहे. कटरा या वैष्णोदेवी मंदिर स्थळाला जाणार्या पहिल्या गाडीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडी दाखवणार आहेत.