आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Used To Visit Solan G Valley To Learn Paragliding From Roshan Thakur

पाहा PM मोदींचे पॅराग्लायडिंग करतानाचे PHOTOS, शिकवणारा म्हणाला- ते खतरों के खिलाडी आहेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅराग्लायडिंग शिकण्यासाठी पीएम मोदींनी सोलांग व्हॅलीमध्ये तीन वेळा भेट दिली आहे. - Divya Marathi
पॅराग्लायडिंग शिकण्यासाठी पीएम मोदींनी सोलांग व्हॅलीमध्ये तीन वेळा भेट दिली आहे.
चंदिगड - हिमाचलच्या कुल्लूमध्ये रविवारी झालेल्या रॅलीमध्ये नरेंद्र मोदींनी खुलासा केला की, ते एकेकाळी कुल्लूच्या सोलंग व्हॅलीमध्ये पॅराग्लायडिंग शिकायला येत होते. 21 वर्षे जुन्या या आठवणीला उजाळा देत ते म्हणाले की, बरुआ गावातील गरीब शेतकरी रोशन यांच्याकडून मी पॅराग्लायडिंगचे धडे घेतले होते. यादरम्यान रॅलीमध्ये उपस्थित रोशन भावुक झाले. त्यांना बिलकूल अपेक्षा नव्हती की, देशाचा पंतप्रधान व्यासपीठावरून त्यांचा असा सन्मान करेल.
 
शिकवणारा म्हणाला- खतरों के खिलाडी आहेत मोदी...
- रोशन म्हणाले की, त्यांना याचा गर्व आहे की, पंतप्रधान मोदींच्या ते लक्षात आहेत. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींना पाहून ते हात हलवून इशारा करणार होते, पण व्यासपीठापासून ते खूप दूर बसलेले होते. 
- रोशन म्हणाले की, आताचे पंतप्रधान पहिल्यांदा 1996 मध्ये शिकायला आले होते. पीएम मोदी पॅराग्लायडिंगसाठी एवढे उत्सुक होते की, 2000 मध्ये ते पुन्हा सोलांग खोऱ्यात आले. मोदी गुजरातचे सीएम बनण्याआधी सोलांग खोऱ्यात तीन वेळा पॅराग्लायडिंग करायला आले. रोशन म्हणाले की, पंतप्रधानांना साहसाची आवड आहे. ते खतरों के खिलाडी आहेत.
 
-रोशन या परिसरात एकमेव पॅराग्लायडिंग स्कूल चालवतात. येथे मिलिटरी आणि सामान्य माणसांनाही ट्रेनिंग दिली जाते. पीएम म्हणाले की, त्यांनी रोशन यांना गुजरातमध्ये पॅराग्लायडिंगची संधी शोधण्यासाठी आमंत्रित केले होते. पहिल्यांदा 2012 मध्ये गुजरातच्या सापुतारामध्ये पहिले उड्डाण झाले. यानंतर दरवर्षी पॅराग्लायडिंग फेस्टिव्हलमध्ये हिमाचलहून पॅराग्लायडर्स गुजरातला जातात.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...