आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांनी केले ममता बॅनर्जींचे कौतुक, देशाच्या आर्थिक विकासाची पायाभरणी केल्याचाही दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी. - Divya Marathi
व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी.
कोलकाता - पंतप्रधान बनल्यानंतर प्रथमच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी रविवारी कोलकात्याच्या दक्षिणेश्वरमध्ये कालीबाडी मंदिरात जाऊन कालीमातेचे दर्शन घेतले.
त्यानंतर मोदींनी रविवारी आसनसोलमध्ये 16,000 कोटीं रुपयांची गुंतवणूक करुन आधुनिकीकरण करण्यात आलेल्या इस्कोच्या बर्नपूर कारखान्याचे त्यांनी उद्घाटन केले. यावेळी आयोजित सभेत मोदी म्हणाले की, देशात नवे सरकार स्थापन होऊन अवघे वर्षभर लोटले आहे. पण या काळात देशात आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी पायाभरणी करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आत संपूर्ण जग एका वर्षात भारताला सर्वात वेगाने पुढे जाणारा देश असल्याचे मान्य करत आहे.
ममतांचे कौतुक केले
यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जोरदार कौतुकही केले. त्या म्हणाल्या की, बंगाल सरकारच्या सहयोगामुळे बांग्लादेशबरोबरच्या सीमासंघर्षावर तोडगा निघाला. यावेळी ममता बॅनर्जीही व्यासपीठावर होत्या. मोदी म्हणाले, आम्ही सगळे टीम इंडिया म्हणून काम करत आहोत. जर विकास करायचा असेल तर पूर्वेकडील भागाचा विकास करावा लागेल. जोपर्यंत बंगाल, कोलकाता याचा विकास होणार नाही तर पूर्वेच्या भागाचा हवा तसा विकास होणार नाही. दुसऱ्या हरित क्रांतीसाठी सर्वाधित संधी पूर्वेकडील राज्यांमध्ये आहेत. बंगालच्या विकासाने बिहार, अासाम अशा राज्यांचाही विकास होईल.
त्याआधी, राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी आणि भाजप नेत्यांबरोबर संतप्रधानांन सकाळी मंदिरात पोहोचले. त्यांनी सुमारे 15 मिनिटे मंदिरात पुजा केली. पंतप्रधान असताना इतर भाविकांसाठी मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता. मंदिरातून निघाल्यानंतर मोदींनी वेल्लूर मठात जाऊन रामकृष्ण मिशनच्या संतांची भेट घेतली. कालीमाता मंदिरात मोदींनी गुजराती भाषेत एक संदेशही लिहिला.

स्वामी विवेकानंदांच्या खोलीत प्रार्थना
काली मातेच्या दर्शनानंतर पंतप्रधान वेल्लूर मठात पोहोचले. याठिकाणी ते सर्वात आधी स्वामी विवेकानंदांच्या खोलीत गेले. मोदींचे आदर्श असलेल्या विवेकानंदांच्या खोलीत त्यांनी काही वेळ प्रार्थना केली. स्वामी विवेकानंदांची समाधी असलेल्या या मठात मोदींनी ध्यानधारणाही केली. यावेळी वेल्लूर मठाचे संतही उपस्थित होते. स्वामी विवेकानंद वेल्लूर मठाच्या याच आश्रमात राहत होते. ते ज्या खोलीत राहायचे ती खोलीही याठिकाणी आहे.

गुरुंचा आशिर्वाद घेतला
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री त्यांचे गुरू आत्मास्थानंद महाराजांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यांना गुरुचा आशिर्वादही घेतला. सहकाऱ्यांकडे त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली. स्वामी वृद्धापकाळाने आजारी असल्याने सध्या रुग्णालयात आहेत. त्यांनी गुरुला शाल आणि धोतरही भेट केले. किशोरवयात असताना मोदी सन्यास घेण्याच्या इच्छेने आत्मस्थानंद महाराजांना भेटले होते. त्यावेळी महाराजांनी मोदी यांना सामाजिक जीवन जगण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरच मोदी आरएसएसशी संलग्न झाले. त्यानंतर भाजपमध्ये येऊन पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

आसनसोलमध्ये रॅली
पश्चिम बंगालमध्ये भाजप आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. यादरम्यान बंगालच्या दौ-यादरम्यान पंतप्रधान रविवारी आसनसोलमध्ये एका सभेत भाषण करणार आहेत. सकाळी साडे अकरा वाजता मोदी आसनसोलमध्ये या सभेत भाषण करतील. यादरम्यान पंतप्रधान 16,000 कोटी रुपये खर्चून आधुनिकीकरण करण्यात आलेल्या इस्कोच्या बर्नपूर कारखान्याचे उद्घाटन करतील.

पुढील स्लाइडवर पाहा, गुरुची भेट घेण्यासाठी पोहोचलेले मोदी...