आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi's Chest Size Is Measured 50 Inches

मोदींची छाती 56 इंच नाहीच, शेरवाणीसाठी दिलेल्‍या मापातून खरी साइज उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्‍ये (बीबीएयू) शुक्रवारी पदवीदान समारंभ आयोजित करण्‍यात आला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार असून, ते खास सोनेरी रंगाची शेरवाणी परिधान करणार आहेत. दरम्‍यान, त्‍यासाठी त्‍यांनी दिलेल्‍या मापामध्‍ये त्‍यांची छाती 56 इंच नव्‍हे तर 50 इंचच असल्‍याचे उघड झाले.
कशी माहिती पडली चेस्ट साइज....
- विद्यापीठाकडूनच या सोहळ्यासाठी मोदी यांच्‍याकरिता शेरवाणी तयार केली जाणार आहे. त्‍यासाठी प्राध्‍यापकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे मोदींच्‍या चेस्ट साइजविषयी विचारणा केली.
- पीएमओने विद्यापीठाला दिलेल्‍या माहितीनुसार, मोदींच्‍या छातीची रुंदी 50 तर खांदे 21 इंच असल्‍याचे सांगितले.
‘56 इंच’ने दिली होती प्रसिद्धी
- वर्ष 2014 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी ‘56 इंचाची छाती’ ही टॅगलाइन वापरली होती.
- ती खूप लोकप्रिय झाली होती. याच टॅग लाइनने मोदी ओळखले जावू लागले.
- एका रॅलीदरम्‍यान मोदी म्‍हणाले, “नेताजी (मुलायम सिंह यादव) म्‍हणतात की मोदी दुसरा गुजरात बनवू शकत नाहीत. तुम्‍हाला माहिती आहे का की दुसरा गुजरात बनवण्‍यासाठी काय पाहिजे ? त्‍यासाठी 56 इंचाची छाती आवश्‍यक आहे”
- पण, मोदींनी केवळ टाळ्या घेण्‍यासाठी छातीबाबत हे वक्‍तव्‍य केले होते की खरेच त्‍यावेळी त्‍यांची छाती 56 इंच होती याचे स्‍पष्‍टीकरण झाले नव्‍हते.
टेलरने काहीही सांगितले नाही
- मोदींचा सूट तयार करणाऱ्या एका दिल्‍लीच्‍या टेलरकडे या बाबत विचारणा केली असता त्‍याने बोलण्‍यास नकार दिला. तो म्‍हणाला हा राजकीय मुद्दा आहे. मी काहीही सांगू शकत नाही.