आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi\'s Speech On Success Of Mars Mission

MOM चे मंगळाशी मिलन झाले आणि आई कधी निराश करत नसते, मोदींची प्रतिक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : बेंगळुरूच्या स्पेस सेंटरमध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

बेंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळ मोहिमेच्या यशानंतर शास्त्रज्ञ आणि देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे. बेंगळुरूच्या इस्रो सेंटरमध्ये या मोहिमेच्या यशाचे साक्षीदार बनलेले मोदी म्हणाले की, आज MOM (Mars Orbiter Mission) चे मंगळाशी मिलन झाले आहे. मार्स ऑर्बिटर मिशनचा शॉर्ट फॉर्म मॉम आहे, आणि मॉम कधी निराश करत नाही.

मिशनचा शॉर्ट फॉर्म जेव्हा मॉम असल्याचे मला समजले तेव्हाच ही मोहीम यशस्वी होणार याचा विश्वास होता. कारण MOM कधी निराश करत नाही. मंगळ मोहीम यशस्वी झाल्याबाबत सर्वांचे अभिनंदन. या ऐतिहासिक क्षणी मी सर्व शास्त्रज्ञांबरोबरच सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. अत्यंत कमी सुविधा असूनही एवढे मोठे यश मिळवणे ही केवळ शास्त्रज्ञांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचा परिणाम आहे, असे सांगत मोदींनी शास्त्रज्ञांचे तोंडभरून कौतुक केले.

भारत चीन जपानला मागे टाकत मंगळावर पोहोचणारा आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने तर अमेरिका आणि युरोपलाही पछा़डले असल्याचा अभिमान असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. आज मोठ्या प्रमाणावर तरुण शास्त्रज्ञ तयार होत आहेत. वरिष्ठ त्यांना प्रेरणा आणि प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. हीदेखिल एक प्रकारे गुरू शिष्य परंपराच आहे.

मोदी म्हणाले, आज आपण इतिहास रचला आहे. आपण जे करून दाखवले आहे, ते सहजपणे शक्य नव्हते. आपल्या शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. जेव्हा आपला क्रिकेट संघ एखादी मालिका जिंकतो तेव्हा संपूर्ण देशात उत्सव साजरा केला जातो. पण आज आपल्या शास्त्रज्ञांनी मिळवलेले यश त्याहीपेक्षा हजारपट अधिक आहे. त्यामुळे वैज्ञानिकांचे हे यश सर्वत्र साजरे करायला हवे.
मी जेव्हा याठिकाणी येण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी शास्त्रज्ञांनी या मिशनमध्ये यश मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने माझी निराशा होईल असे म्हटले होते. पण जर ही मोहीम अयशस्वी ठरली तर इथे उपस्थित असल्याने सर्वात मोठी जबाबदारी माझी ठरेल, असे उत्तर त्यांना दिल्याचे मोदी म्हणाले. जेव्हा एखादे काम मंगल असते, त्यामागची भूमिका मंगल असते तेव्हा मंगल यात्राही मंगल होते, अशा शब्दांच मोदींनी या यशाचे वर्णन केले.
आपण या क्षेत्रात सामर्थ्यवान असल्याचे आपल्या अंतरार मोहीमेवरून सिद्ध होत असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. अपयश टीका सोबत घेऊन येत असते, तर यश इर्ष्या सोबत घेऊन येत असते. या यशानंतर आपल्या समोरचे आव्हान आणखी वाढले आहे. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला आणखी परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, आमच्या वैज्ञानिकांनी मंगळ मोहीम यशस्वी करण्याचा कारनामा एखाद्या हॉलीवूड चित्रपटाला लागणा-या खर्चापेक्षाही कमी खर्चात साध्य केल्याचे म्हटले आहे. मोदींनी यापूर्वीही मंगळ मोहिमेचा उल्लेख करताना हॉलीवूडच्या 'ग्रॅव्हिटी' चित्रपटाचा उल्लेख केला होता.

पुढील स्लाइडवर पाहा PHOTOS
छायाचित्रे सौजन्य दूरदर्शन