जम्मू/श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी एक हजार कोटींची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे. है नैसर्गिक संकट असल्याचेही मोदींनी यावेळी जाहीर केले. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून पुढेही आवश्यक ती सर्व मदत पुरवणार असल्याचे आश्वासनही मोदींनी दिले. तसेच इतर राज्यांनीही शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरबरोबरच पाकव्याप्त काश्मीरमध्येही पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील पुनर्वसनासाठी किंवा इतर काही मदत हवी असल्यास पाकिस्तान सरकारला मदत करण्याची तयारी असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले आहे. हे अत्यंत भीषण असे नैसर्गिक संकट असून मानवतेच्या दृष्टीकोनातून
आपण मदत करण्यास तयार असल्याचे मोदी म्हणाले आहेत. तसेच या संकटातून सावरून पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर एक नवी शक्ती म्हणून समोर येणार असल्याचा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
पाकव्याप्त काश्मीरलाही मदत
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा वाजेच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी याठिकाणी पोहोचले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि राज्यपाल एन.एन. व्होरा सह प्रमुख अधिका-यांकडून माहिती घेतली.
पंतप्रधानांनी पूरग्रस्त परिस्थितीची विमानातून पाहणी करण्याऐवजी राज्यातील प्रमुख अधिका-यांशी चर्चा करण्यास प्राधान्य दिले. मदतकार्यासाठी काय पावले उचलली जात आहे, याचा आढावा पंतप्रधानांनी चर्चेद्वारे घेतला.
उत्तराखंडसारखेच संकट
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी उत्तराखंडमध्ये जशी स्थिती निर्माण झाली होती, तशीच काहीशी स्थिती जम्मू काश्मीरमध्ये आहे. जम्मू काश्मीर सरकारने या संकटाला राष्ट्रीय संकट घोषित करण्याची मागणी केली आहे. ओमर अबदुल्ला यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शनिवारी ही मागणी केली.
धोक्याच्या पातळीपेक्षा आठ फूट उंचीवरून वाहतेय पाणी
जम्मूला देशाशी जोडणा-या पाचही पुलांना धोका निर्माण झाला आहे. या पुलांवरूल वाहतूक थांबवण्यात आली आहे. पण लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी या पुलांचा वापर करावाच लागत आहेत. तावी नदी शनिवारी धोक्याच्या पातळीपेक्षा आठ फूट उंचावरून वाहत होती. विक्रमनगरमधील पूल आणि नदीत केवळ चार फूट अंतर शिल्लक होते. या नदीवर पाच पूल आहेत. या पुलांवरूनच श्रीनगर, कटरा, राजौरी, पुंछ, उधमपूर कडे जाता येते.
पतंगरावांनी राष्ट्रवादीवर टीका
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी आघाडीतील मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रसेवर टीका केली आहे. आघाडी झाली नाही, तर राष्ट्रवादीच्या दोन टक्के जागाही निवडून येणार नाहीत. तसेच सत्ता गेली तर राष्ट्रवादीचे अनेक नेते तुरुंगात जातील अशी प्रतिक्रिया पतंगरावांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा पंतप्रधानांच्या दौ-याचे आणि पूरस्थितीचे फोटो...
फोटो सौजन्य - एएनआय