आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM, Sonia Flag Off Train Connecting Banihal, Qazigund In J K

काश्मिरमध्‍ये \'सोनियाचा दिनू\', महत्त्वाकांक्षी बनिहाल-काझीगुंड रेल्‍वेसेवा सुरु

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्‍मू आणि काश्मिरच्‍या इतिहासात आजचा दिवस 'सोनियाचा दिनू' ठरला आहे. रेल्‍वेच्‍या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पाचे आज उद्घाटन करण्‍यात आले. बनिहाल आणि काझीगुंडदरम्‍यान रेल्‍वेसेवेचा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्‍या (युपीए) अध्‍यक्ष सोनिया गांधी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

जम्‍मू विभागात असलेल्‍या बनिहाल आणि काश्मिरच्‍या खो-यातील काझीगुंड या दोन शहरांना रेल्‍वेसेवेने जोडण्‍यात आले आहे. या दोन शहरांमध्ये रस्‍त्‍याद्वारे 35 किमी अंतर आहे. परंतु, रेल्‍वेसेवेमुळे ते केवळ 18 किलोमीटरपर्यंत आले आहे. या रेल्‍वेमार्गाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन 11 किलोमीटर लांबिचा बोगदा तयार करण्‍यात आला आहे. अनेक अडचणींवर मात करुन या बोगद्याचे काम पूर्ण करण्‍यात आले. बनिहाल येथून शालेय विद्यार्थी, रेल्‍वे तसेच 'इरकॉन'च्‍या कर्मचा-यांना घेऊन निघालेली रेल्‍वेगाडी केवळ 25 मिनिटांमध्‍येच काझीगुंड येथे पोहोचली. स्‍वतः डॉ. मनमोहनसिंग यांनी या गाडीत प्रवास करुन काश्मिरच्‍या खो-यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला.