आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदी CM नितीश यांच्याबद्दल लालू म्हणाले- \'छानिएगा जलेबी निकलेगा पकौडी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- गुरु गोविंदसिंग यांच्या 350  प्रकाशोत्सव सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्यासोबत व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने लालूप्रसाद यादव नाराज झाले आहेत.     

दरम्यान, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि रामविलास पासवान यांना PMOच्या अधिकाराने व्यासपीठावर स्थान मिळवले होते. मात्र, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना व्यासपीठासमोर प्रेक्षकांसोबत जमिनीवर बसावे लागले. 

पंतप्रधानांनी नितीशकुमारांंवर स्तुतीसुमने उधळली, भरभरून प्रशंसा केली, याबाबत तुम्हाला काय वाटते? पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नावर लालूंनी 'छानिएगा जलेबी और निकलेगा पकौडी', अशी शेलक्या भाषेत टीका केली. दरम्यान, प्रकाशोत्सवच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान पाटण्यात पोहोचले होते.

लालू यादव म्हणाले, पीएम प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन स्तुती करतील का..? 
- नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी एकमेकांवर उधळलेली स्तुतीसुमने हा राजकीय स्टंट' असल्याचा दावा लालूंनी केला आहे. 
-नितीश कुमार या कार्यक्रमाचे नेतृत्त्व करत आहेत. ते महायुतीचे मुख्यमंत्री असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.      
- पंतप्रधानांनी राज्य सरकारची प्रशंसा करायला हवी, कोण्या एका व्यक्तीची नाही. पंतप्रधान आता प्रत्येकाचे नाव घेऊन स्तुती करतील का?, असा सवाल लालूंनी उपस्थित केला आहे.

व्यासपीठावर मंत्र्यांना स्थान न मिळाल्याने पीएमओकडे  तक्रार -
 - प्रकाशोत्सव कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पीएमओ     स्थान न मिळाल्याने पीएमओकडे तक्रार केली आहे.  
- केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांना व्यासपीठावर स्थान द‍िले होते. पण, ते व्यासपीठावर गेले नाहीत, असे पीएमओ स्पष्ट केले आहे.      
 
 मुलांसोबत गेले होते लालूप्रसाद यादव 
- व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव नाराज झाले आहेत. 
- लालूप्रसाद यादव, तेजप्रताप आणि तेजस्वी यादव या दोन्ही मुलांसोबत गांधी मैदानावर उपस्थित झाले होते. 
- तेजस्वी यादव राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, तर तेजप्रताप यादव नितीश यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहे. 

आधी यांना मिळाले होते व्यासपीठावर स्थान
-पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, बिहारचे सीएम नितीश कुमार, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, पाटणा ट्रस्टचे अध्यक्ष अवतार सिंह मक्कर, अमृतसरचे ट्रस्टचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्य सचिव व्यासपीठावर स्थान म‍िळाले होते.   
 
काय आहे प्रकाश पर्व? 
-गुरु गोविंद सिंग यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 ला पाटणा येथे झाला. 
-'आगमन दिवस' म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 
- नानकशाही कॅलेंडरमध्ये गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस 5 जानेवारी केला गेला.
-  गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिवस प्रकाश पर्व दिन म्हणून साजरा केला जातो. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, व्यासपीठावर खुर्ची न मिळाल्याने खाली बसलेले लालूप्रसाद यादव यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...