आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजमेरमध्ये नकवींना म्हणाले पाकिस्तानी, 'तुमच्या देशासारखा व्हावा आमचा देश'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने बुधवारी अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या मजारवर चादर चढविण्यात आली. केंद्रीय मंत्री मुख्यात अब्बास नकवी यांनी मोदींच्या वतीने चादर चढवली. त्यावेळी नकवींचा सामना पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळाशी झाला. दोघांमध्ये चर्चा झाली. पाकिस्तानी शिष्टमंडळाने नकवींना सांगितले, की आम्ही ख्वाजा साहेबांकडे 'दुवा' मागतली की पाकिस्तानही हिंदूस्थान सारखे झाले पाहिजे.
नकवी म्हणाले, ख्वाजा साहेब माणुसकीचे पुरस्करर्ते होते. त्यांनी देशात शांतता आणि मैत्रीचा संदेश दिला. ते मानवतेचे प्रतिक होते. नकवी म्हणाले, 'पंतप्रधान मोदी त्यांचाच संदेश घेऊन देशाला पुढे घेऊन जात आहेत. रविवारापासून सुरु होत असलेल्या उरुसाच्या निमीत्त पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली आहे, की देश विकासाच्या मार्गावर पुढे गेला पाहिजे. जगात आपल्या देशाचे नाव व्हावे. देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाचे फायदे पोहोचले पाहिजे.'
यासाठी महत्त्वाची आहे मोदींची चादर
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांच्यावतीने रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टी केली गेली नव्हती. भारताच्या इतिहासात एखाद्या पंतप्रधानाने इफ्तारचे आयोजन केले नाही, अशी ही पहिली वेळ होती. विविध पक्षाच्या नेत्यांनी याचे अनेक राजकीय अर्थ काढले होते. टीका केली होती. या पार्श्वभूमीवर मोदींनी अजमेर शरीफ येथे चादर चढवण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, मोदींच्या आधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावतीने सोमवारी चादर चढवण्यात आली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नकवींच्या वतीने चादर चढवण्यात आल्याचे फोटोज्