आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poem Ravi Korde Presented Youth Sahitya Academy Award

कवी रवी कोरडे यांचा युवा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - औरंगाबादचे कवी रवी लक्ष्मीकांत कोरडे यांना बुधवारी येथील टाऊन हॉलमध्ये झालेल्या समारंभात साहित्य अकादमीच्या वतीने युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘धूसर झालं नसतं गाव’ या काव्यसंग्रहासाठी त्यांचा गौरव झाला. 50 हजार रुपये रोख आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इतर भारतीय भाषांतील 22 साहित्यिकांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रसिद्ध साहित्यिक नंदकिशोर आचार्य प्रमुख पाहुणे होते. अकादमीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ प्रसाद तिवारी, सचिव के. श्रीनिवास राव यांच्यासह शायर शीन काफ निजाम, हबीब कैफी यांचीही उपस्थिती होती. अकादमीतर्फे 6 व 7 फेब्रुवारी रोजी होणार्‍या साहित्य संमेलनात पुरस्कारविजेते रचना सादर करणार आहेत.