आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीओकेच्या विस्थापितांना मिळू लागले पीएम पॅकेज, केंद्राचे 2000 कोटी मंजूर, मेहबूबांच्या हस्ते वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू : केंद्र सरकारच्या वतीने पीएम पॅकेजमधून मंजूर झालेली २००० कोटी रुपयांची रक्कम अधिकृत काश्मीरच्या विस्थापितांना मिळणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पीओके विस्थापितांना पॅकेजच्या रकमेचे धनादेश वाटले आहेत. त्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर १९४७ च्या विभाजनाचा सर्वात मोठा शिकार झालेला आहे.
राज्यातील अनिश्चितता व गोंधळाची परिस्थिती दूर करण्यासाठी प्रत्येक क्षेत्र, विचारसरणी आणि धर्माच्या लोकांना राज्याच्या समोरील मुद्द्यांना सोडवण्यासाठी लोकांना एकत्रित येऊन एकजूट करून लढावे लागेल.
विस्थापितांसाठी आर्थिक मदत पॅकेजच्या प्रारंभाप्रसंगी विस्थापितांच्या सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही राज्यापेक्षाही अधिक जम्मू-काश्मीरचे लोक १९४७ च्या विभाजनानंतरही अद्यापपर्यंत या समस्येमुळे त्रस्त आहेत.
अनिश्चितता आणि निराशा दूर करण्यासाठी लोकांनी एकदुसऱ्याचा हात हातात घेतला पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध सुनिश्चित करणे आणि पुढे नेण्यात राज्याच्या अनेक लोकांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

हे आहे पीओकेच्या विस्थापितांचे प्रकरण
१९४७ मध्ये कबायलिंच्या वेशात पाक सैन्य जम्मू-काश्मीरच्या भागातील मुजफ्फराबाद, मीरपूर, कोटली, छब्ब यावर हल्ला केला होता. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित होऊन जम्मू तसेच देशाच्या अन्य भागात वसले. हा भाग आता पाकव्याप्त काश्मिरात आहे.
बातम्या आणखी आहेत...