आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Accused Of Minor Girl Kidnapped Rape Badayun Lucknow

बदायूं : पोलिसांनी अपहरण करून पोलिस क्वार्टरमध्येच केला मुलीवर बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/बदायूं - येथील मुसाझाग ठाण्यात तैनात असणा-या दोन पोलिस कर्मचा-यांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या दोघांनी मुलीचे अपहरण करून तिला सरकारी क्वार्टर्समध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडिता आणि तिच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर या दोन्ही पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. दोन्ही आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. मुसाझाग ठाण्याच्या हद्दीतील गावातील रहिवासी असणारी पीडिता (15 वर्षे वय) 31 डिसेंबरला रात्री शौचेस जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी अवनीश यादव आणि वीरपाल यादव या दोघांनी तिला अटक केली. त्यानंतर रात्री उशीरा ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरकारी क्वार्टरमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा तिची तब्येत खराब होत आहे असे त्यांना जाणवले त्यावेळी तिला परत गावात सोडून त्यांनी पळ काढला.

घरी आल्यानंतर पीडितेने नातेवाईकांना सर्व काही सांगितले त्यावेळी तिचे कुटुंबीय गावक-यांबरोबर ठाण्यात आले. त्यांनी घटनेची माहिती देताच पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीला पाठवले. त्यानंतर गुन्हा दाखल करून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना निलंबित करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, PHOTO