आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Again Interrogate Dera Sacha Sauda Management Member Vipassana Singh In Panchkula

विपश्यनाची आज पुन्हा चौकशी, डेराच्या प्रॉपर्टी संबधी होऊ शकते विचारणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागीलवेळी हनीप्रीत आणि विपश्यनाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. (फाइल) - Divya Marathi
मागीलवेळी हनीप्रीत आणि विपश्यनाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. (फाइल)
पंचकुला - डेरा सच्चा सौदाची मॅनेजमेंट मेंबर विपश्यना इन्साची सोमवारी पुन्हा चौकशी होणार आहे. पंचकुला पोलिसांनी तिला पुन्हा पोलिस स्टेशनला बोलावले आहे. डेऱ्यांशी संबंधीत प्रॉपर्टीची विपश्यनाकडून माहिती घ्यायची आहे. याआधी 13 ऑक्टोबरला हनीप्रीत आणि विपश्यना यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. हनीप्रीत आणि विपश्यना या दोघी दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमच्या खास राजदार समजल्या जातात. 
 
लॅपटॉप आणि डायरीबद्दलही होणार प्रश्न 
- विपश्यनाला डेराच्या बेनामी संपत्तीसोबतच गायब झालेला लॅपटॉप आमि डायरीबद्दलही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. 
- डेराच्या संपत्तीची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मागवली आहे. ती पोहोचवण्याचे काम पोलिस करत आहेत. 
- पोलिसांनी ईडीला एक हार्डडिस्कही सोपवली आहे. ज्यामध्ये डेराच्या संपत्तीची माहिती आहे. 

हनीप्रीत-विपश्यनामध्ये झाली होती तु तु - मैं मैं 
- शुक्रवारी पंचकुला एसआयटीने हनीप्रीत इन्सा हिची पोलिस कोठडी संपण्यापूर्वी विपश्यना आणि तिला समोरासमोर बसवून चौकशी केली होती. सुरुवातीला दोघीही नॉर्मल होत्या. मात्र जेव्हा हनीप्रीत आणि विपश्यना एकमेकींवर आरोप करायला लागल्या तेव्हा त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. 
- 4 तास 51 मिनिट दोघींची चौकशी करण्यात आली. हनीप्रीतने प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात विपश्यनाला ओढले. पोलिसांनी विपश्यनाला 40 प्रश्न विचारले. त्यात तिने प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात मला काही माहित नाही ऐवढेच सांगितले होते. त्यामुळे पोलिस पुन्हा एकदा विपश्यनाची चौकशी करणार आहेत.
 

 
लॅपटॉपचे गौडबंगाल 
बाबा राम रहीमची विश्वासू साथीदार हनीप्रीतचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक धक्कादायक माहिती हाती लागली असल्याचा दावा पोलिसांनी केला. या लॅपटॉपमध्ये पंचकुला येथे दंगल घडवण्याच्या कटाचे नियोजन होते. तसेच त्यासाठी वापरलेल्या पैशाचे स्त्रोतसुद्धा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जमा करण्यात आलेली मालमत्ता आणि उभ्या केलेल्या कंपन्यांची सर्व कागदपत्रे पोलिसांकडे आहेत. पोलिसांनी मोबाइल व लॅपटॉप सील करून लॅबमध्ये तपासासाठी पाठवला आहे. यातील बरीच माहिती काढून टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून ती पुन्हा मिळवणे आवश्यक आहे. दरम्यान, हनीप्रीत व विपश्यना यांची शुक्रवारी पोलिस ठाण्यात समोरासमोर भेट झाली होती.
 
पोलिसांची माहिती ऑन द रेकाॅर्ड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतचा लॅपटॉप सिरसा येथून जप्त करण्यात आला. तर मोबाइल विपश्यना घेऊन आली होती. ताे मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. विपश्यना व हनीप्रीतच्या समोरच तो सिल करण्यात आला.
 
ऑफ द रेेकॉर्ड
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरसा पोलिस, लष्कर व अधिकारी डेरामध्ये झडतीसाठी गेले होते. त्यावेळी येथील कागदपत्रे, लॅपटॉपसह इतर साहित्य त्यांनी एका पोत्यात बांधून ठेवले होते. ते पोते सिरसा येथेच राहिले. या सामानाकडे पोलिसांचे लक्ष गेले नाही. नंतर पोलिसांनी बैठक घेतली. डेरामध्ये जे काही सापडले त्याची पुन्हा तपासणी व्हावी असा निर्णय झाला.
बातम्या आणखी आहेत...