आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhattisgarh Police Arrest Seven, Seize Explosives Meant For Maoists

छत्‍तीसगडमध्‍ये 1750 किलो स्फोटके जप्त; 7 नक्षल सर्मथकांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 बॉक्समध्‍ये जिलेटिन रॉड सापडले. - Divya Marathi
30 बॉक्समध्‍ये जिलेटिन रॉड सापडले.
रायपूर (छत्तीसगड) - बस्तर येथे पोलिसांनी आज (शक्रवार) गुप्‍त माहितीच्‍या आधारे नक्षलसमर्थकांकडून 1750 किलो स्फोटके जप्त केली असून, सात जणांना अटक केली. यामध्‍ये 750 किलोग्राम जिलेटिन आणि एक हजार किलोग्राम अमोनियम नायट्रेटचा साठा आहे. अटक करण्‍यात आलेले सर्व आरोपी ओडिशाचे रहिवाशी आहेत. त्‍यांच्‍याकडे वाहनांच्‍या आठ बनावट नंबर प्लेट्ससुद्धा आढळल्‍या.

बस्तर आयजी एसआरपी कल्लुरी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, “ओडिशाचा मायनिंग इंजीनियर कमलकांत नक्षलवाद्यांना स्‍फोटकांचा पुरवठासुद्धा कात असल्‍याची गुप्‍त माहिती मिळाली होती. त्‍या आधारे आम्‍ही ही कारवाई केली. अधिक तपास एसपी अजय यादव करत आहेत'', अशी माहिती त्‍यांनी दिली.
पोलिस गेले होते ग्राहक बनवून
पोलिसांनी ग्राहक असल्‍याचे सांगत कमलकांत याच्‍यासोबत संपर्क केला आणि स्‍फोटकांची मागणी केली. त्‍यावर कमलकांतने त्‍यांना 30 हजार रुपये अॅडवांस आरपल्‍या अकाउंटमध्‍ये जमा करण्‍याचे सांगितले. पैसे मिळाल्‍यानंतर त्‍याने डिलिवरीसाठी थोडा वेळ मागितला. 24 सप्‍टेंबरला त्‍याने कॉल करून एका रस्‍त्‍यावर डिलिवरी देणार असल्‍याचे सांगितले. दरम्‍यान, पोलिसांनी लावलेल्‍या सापळ्यात तो अडकला. जप्‍त करण्‍यात आलेल्‍या स्‍फोटकांची किंमत 1 लाख 40 हजार रुपये आहे.
ही स्‍फोटके जप्‍त केलीत
>30 बॉक्समध्‍ये जिलेटिन रॉड
>20 बोरी अमोनियम नाइट्रेट
>1 बण्डल कारडेक्स वायर
>8 बनावट नंबर प्लेट
>1 बोलेरो पिक-अप
>1 इंडिका कार आणि एक बाइक
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...