आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या प्रियकराला जुळ्या भावांनी दिला असा मृत्यू, म्हणाले- आमच्या समोरच करायचा असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रायव्हरच्या खुनात चौघांना अटक झाली. यातील दोन जुळे भाऊ आहेत. - Divya Marathi
ड्रायव्हरच्या खुनात चौघांना अटक झाली. यातील दोन जुळे भाऊ आहेत.
फरिदाबाद - फरिदाबाद पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओला टॅक्सी ड्रायव्हरच्या खुनाचा उलगडा केला आहे. या प्रकरणात दोन जुळ्या भावांना आणि त्यांच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे. मर्डरच्या या प्रकरणाने शनिवारी नवे वळण घेतले, जेव्हा पोलिसांच्या सापळ्यात अडकलेल्या दोन जुळ्या भावांनी खुनामागची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, त्यांच्या 45 वर्षीय आईचे या ड्रायव्हरसोबत अवैध संबंध होते.
 
6 महिन्यांआधी झाली होती फेसबुकवरून मैत्री, आक्षेपार्ह अवस्थेत पकडले...
- गुरुवारी डबुला कॉलनीत उभ्या असलेल्या एका कॅबमध्ये पोलिसांना डेडबॉडी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी डेडबॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपासाची सूत्रे हलवली.
- मृताची ओळख पटली सैनिक कॉलनीत राहणारा राजकुमार म्हणून. त्याचा मेहुणा अमरजित पोलिसांना म्हणाला, त्याने त्याची कार ओला कॅब कंपनीला रजिस्टर्ड केली होती. रोजच्या प्रमाणे बुधवारी सकाळी 11ला तो घरातून निघाला. रात्री 10ला घरी फोन करून लवकर घरी येणार असल्याचे त्याने सांगितले होते. यावर त्याच्या पत्नीने घरी येताना दूध आणि फळे घेऊन येण्याचे सांगितले होते. पण, 11 वाजले तरी तो घरी आला नव्हता.
- नंतर नातेवाइकांनी संपर्क केला तर त्याचा फोन बंद येत होता. रात्री दीड पर्यंत त्याला सर्व फोन करत होते, पण फोन स्विच ऑफच येत होता. राजकुमारच्या खुनाची खबर आम्हाला सकाळी साडेसातला मिळाली.
 
गळ्यावर केले होते 14 वार
- नातेवाइक घटनास्थळी पोहोचले तर निर्घृण खून पाहून त्यांची बोबडीच वळली. धारदार हत्याराने त्याच्या गळ्यावर 14 वार करण्यात आले होते. याशिवाय छाती आणि पोटावरही वार करण्यात आले होते. काहीच कळत नव्हते की कुणी आणि कोणत्या कारणाने राजकुमारचा निर्घृण खून केला.
 
असा लावला पोलिसांनी छडा
- पोलिसांनी तपास सुरू केल्यावर राजकुमारची पत्नी स्वर्णा म्हणाली की तिचा पती न्यू जनता कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी नेहमी जायचा.
- शुक्रवारी सकाळी पोलिस त्या महिलेच्या घरी पोहोचले आणि त्याची चौकशी केली असता महिलेची दोन्ही मुले घरातून गायब होती. मग पोलिसांनी महिलेची मुले राहुल आणि रोहितला शोधून काढले.
 
का आणि कसा झाला खून?
- प्रकरणाचा उलगडा करणारे सब इन्स्पेक्टर नरेंद्र म्हणाले, आरोपींची 45 वर्षीय आई फेसबुक युजर आहे. 6 महिन्यांआधी त्याची आई आणि राजकुमारदरम्यान दोस्ती झाली होती. यानंतर राजकुमारचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले.
- मुले म्हणतात, नेहमी ते आई आणि राजकुमारला बेडरूममध्ये पाहायचे. त्यांनी आईला समजावले, पण तरीही राजकुमारचे येणे-जाणे सुरूच राहिले. राजकुमारने हद्द पार करणे सुरू केले होते. दारूच्या नशेत जबरदस्ती तो महिलेला बेडरूममध्ये ओढून न्यायचा.
- बुधवारी रात्रीही असेच झाले, मग या पोरांना हे सहन झाले नाही. दोघांनी त्यांचे मित्र अरविंद्र आणि आणखी एका अल्पवयीन मित्राला बोलावले.
- रात्री 11 वाजताच राजकुमार घरातून बाहेर निघाला, चौघांनी त्याला घेरले. त्याच्यावर वीट, गुप्ती आणि चाकूने हल्ला चढवला. खून करून मृतदेह त्याच्याच कारच्या मागच्या सीटवर ठेवले आणि गाडी रोडवर सोडून फरार झाले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...