आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही पायांनी अपंग 3 महिन्यांपासून करत होता रेप, \'आता बस्स!\' म्हणत तरुणीची पोलिसांत धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणीने सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. - Divya Marathi
तरुणीने सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
फतेहाबाद (हरियाणा) - फतेहाबादच्या एका मुलीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुलीने स्वत: पोलिस मदत केंद्रात फोन करून वाचवण्यासाठी साकडे घातले. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले व आरोपीला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ अटक केली.
 
खासगी शाळा चालवतो दोन्ही पायांनी अपंग असलेला आरोपी
- महिला पोलिस स्टेशनच्या एसएचओ बिमलादेवी यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या हेल्पलाइनवर कॉल आला होता. यात मुलीने आपबीती सांगून म्हटले की, माझे सावत्र वडील माझ्यावर अत्याचार करत असून, मला त्यांच्या तावडीतून वाचवा...
- सूचना मिळताच महिला पोलिसांनी अॅक्शन घेतली आणि मुलीने सांगितलेल्या पत्त्यावर पपिहा टुरिस्ट कॉम्प्लेक्सवर जाऊन धडकल्या. आदमपूरच्या राहणाऱ्या सावत्र बापाने एक खोली बुक केलेली होती. या खोलीतच तो आपल्या मुलीवर पाशवी अत्याचार करत होता.
- पोलिसांनी त्याला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले, तर मुलीला मेडिकल तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
- दोन्ही पायांनी अपंग असलेल्या या आरोपीशी मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. तो आदमपूरमध्येच एका खासगी शाळा चालवतो. आणि मुलगी त्याच शाळेत कॉम्प्युटर शिक्षिका आहे.
 
तरुणी सांगितली आपबीती
- तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिचा सावत्र बाप मागच्या तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत आला आहे. येथे फतेहाबादच्या हॉटेलमध्ये आज तिसऱ्यांदा घेऊन आला.
- नेहमी नेहमी होणाऱ्या या अत्याचाराला त्रासून शेवटी तिने पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. सिव्हिल ड्रेसमध्ये घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तरुणी आणि तिच्या बापाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.
- हेही समजते की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे या हॉटेलमधील बिअर बार बंद झाल्याने, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणीही येथे फिरकत नव्हते.
- पोलिसांनी सांगितले की, आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्यावर सावत्र पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याचे कबूल केले आहे. त्याच्यावर बलात्कारासहित इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या मेडिकलनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी काही फोटोज
बातम्या आणखी आहेत...