आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Beat Sadhu, Issue About Ganesh Visarjan In Ganga River

गंगेत गणपती विसर्जनाचा हट्ट धरणाऱ्या साधूंवर लाठीमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- वाराणसीमध्ये गंगा नदीत गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आडून बसलेल्या साधूंवर उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी जोरदार लाठीमार केला. त्यात शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे शिष्य अविमुक्तेशवरानंद व त्यांच्या श्रीवि्द्यामठात शिकणारे अनेक शिष्य जखमी झाले. लाठीमार सुरू होता तेव्हा काही काळ दगडफेकही झाली. त्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात गणेश मूर्तींचे लक्ष्मीकुंडात विधीवत विजर्सन केले. वाराणसी येथे गंगा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी अविमुक्तेशवरानंद यांनी आग्रह धरला होता. परंतु पोलिसांनी त्यास नकार देत कुंडात विसर्जन करण्याचा आग्रह धरला. साधूंनी त्याला नकार दिल्यानंतर प्रकरण गंभीर बनले. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. पोलिस लाठ्या मारत होते. तरीही अविमुक्तेशवरानंद व त्यांचे शिष्य ठाम होते. एक साधू बेशुद्ध पडला. त्यामुळे लोकांनी आक्रमक होत निर्दशने केली. तसेच दगडफेकही सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी जोरदार लाठीमार करत साधू व जमावाला दूरपर्यंत पिटाळून लावले. गणेश मंडळांची वाहने बंदोबस्तात विर्जन कुंडापर्यंत नेण्यात आली व तेथे त्यांचे विसर्जन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी विंध्यवासिनी राय यांनी सांगितले की, आम्ही दोन दिवसांपासून धरणे धरलेल्या लोकांना तेथून हटण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यामुळे रहदारीस अडथळा येत असल्याने पोलिसांना लाठमार करावा लागला.