आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये 10 लोकांना भेटू इच्छितो राम-रहीम, पोलिस अद्यापही पोहचू शकले नाहीत या व्यक्तींपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीमची अत्यंत जवळची व्यक्ती म्हणजे हनीप्रीत. पोलिस अद्याप तिला अटक करु शकलेले नाहीत. - Divya Marathi
राम रहीमची अत्यंत जवळची व्यक्ती म्हणजे हनीप्रीत. पोलिस अद्याप तिला अटक करु शकलेले नाहीत.
सिरसा- बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या गुरमीत राम रहीम याने मुलगी हनीप्रीत, आई नसीब आणि डेऱ्यातील अधिकारी असणाऱ्या विपसना यांच्यासह 10 लोकांना जेलमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहतक जेल प्रशासनाने या नावांची यादी रविवारी सिरसा पोलिसांना दिली. पोलिस अद्याही या व्यक्तींपर्यंत पोहचू शकलेले नाहीत.
 
पोलिसांना यापैकी कोणीही डेरात भेटलेले नाहीत. हे सर्वजण राम-रहीम सोबत राहत होते. सीबीआय न्यायालयाने पंचकूलात 25 ऑगस्ट रोजी डेरा प्रमुखाला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवले होते. 28 ऑगस्टला त्याला 2 गुन्ह्यांमध्ये 20 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हापासून राम-रहीम रोहतक जेलमध्ये आहे. 
 
यादीत आहे कोणा-कोणाचे नाव
सिरसा जेल प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या यादीत गुरमीत राम रहीम यांची आई नसीब कौर, मुलगा जसमीत सिंह, मुलगी चरणप्रीत, अमरप्रीत आणि हनीप्रीत, हुस्नप्रीत, जावई शान-ए-मीत आणि रूह-ए-मीत यांच्या नावाचा समावेश आहे. 
- यांच्यापैकी कोणीही सध्या डेरात नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. डेरा व्यवस्थापिका विपसना हिने दुरचित्रवाणी वाहिनीला एक दिवसापूर्वी मुलाखत दिली होती. मात्र पोलिसांना ती तेथे आढळून आलेली नाही. 
 
राजस्थान पोलिसांची मदत घेण्यात येणार
 - या 10 जणांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांनी गंगानगर, बठिंडा, शामली, करनाल या ठिकाणी त्यांचा शोध घेतला आहे. 
- आता हरियाणा पोलिस याप्रकरणी राजस्थान पोलिसांची मदत घेण्याचा विचार करत आहेत. 
- डेरात कोणीही सापडले नसल्याचे जेल प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
 
पोलिसांना डेरात सापडली हत्यारे
डेराने आतापर्यंत 33 परवानाधारक हत्यारे पोलिसांनी दिली आहेत. यात रिव्हॉल्वर, पिस्तुल आणि गन, रायफलचा समावेश आहे. ज्या लोकांनी हत्यारे दिलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान हनीप्रीतला अटक झाल्याची अफवा देखील पसरली होती. 
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...