आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Close In On Sant Rampal Ashram News Hisar Haryana

एका बाबाच्या अटकेसाठी 30 हजार पोलिस, अधिकार्‍यांनी केली आश्रमाची हवाई पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरवाला/हिस्सार (हरियाणा) - न्यायालयाच्या अवमान प्रकरणी बाबा रामपाल यांना सुप्रीम कोर्टाने कोणताही दिलासा दिला नाही. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी करुन 17 नोव्हेंबरपर्यंत त्यांना कोर्टात हजर करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी संत रामपाल यांच्या अटकेची पूर्ण तयारी केली आहे. पोलिस फौजफाट्यासह निमलष्करी दलाच्या 30 कंपन्या बरवाला येथे दाखल झाल्या आहेत.
रामपाल यांच्या आश्रमापासून 300 मीटर अंतरावर पोलिस उभे आहेत. आश्रमाकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. वीज, पाणी बंद करण्यात आले असून दुध, फळ, भाजीपाला पुरवठाही बंद करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केल्यानंतर हिस्सारचे आयजी, पाच जिल्ह्यांचे पोलिस अधिक्षक आणि जवळपास 20 डीएसपी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिसांकडे शनिवार आणि रविवारचाच वेळ आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी हिस्सारमध्ये तळ ठोकून आहेत. आश्रमाचे हवाई सर्व्हेक्षण देखील करण्यात आले आहे. पोलिस कोणत्याही क्षणी आश्रमात दाखल होऊन कारवाई करु शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. तर, संत रामपाल यांचे अनुयायी आश्रमाला वेढा टाकून बसले आहेत.
रामपाल पोलिसांना शरण येणार नाही - प्रवक्ता
आश्रमाचे प्रवक्ते राज कपूर आणि पदाधिकारी राहुल म्हणाले, की हायकोर्टाच्या अटक वॉरंटवर सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी केली नाही. मात्र आम्ही रामपाल यांना अटक करु देणार नाही. जोपर्यंत गुरुजींची प्रकृती बरी होत नाही, तोपर्यंत पोलिसांनी आश्रमाच्या जवळ येऊ नये. राज कपूर म्हणाले, गुरुजी आत्मसमर्पण करणार नाही.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहे प्रकरण आणि पाहा, 30 हजार पोलिस आश्रमात घुसण्यासाठी तयार