आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला सोडून प्रियकराकडे गेली तरूणी, सासरी निघाली तेव्हा केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह, इन्सेक्टमध्ये पोलिसांनी पकडलेला आरोपी. - Divya Marathi
मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह, इन्सेक्टमध्ये पोलिसांनी पकडलेला आरोपी.
मेडता सिटी (नागौर) - पाच दिवसांपूर्वी  निर्जनस्थळी एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता, या प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. तरूणीचा खून तिच्या प्रियकरानेच केला होता. चेहरा पुर्णपणे जळाल्यामुळे तिची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी आधारकार्ड मशीनच्या मदतीने तिची ओळख पटवली. आरोपीला अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आले होते, कोर्टाने त्याला तीन दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.

असे आहे प्रकरण...
जोधपूर रोडवर गुरूदेव नगरमध्ये 27 ऑक्टोबरला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळला होता. या ब्लाइंड मर्डर केसमध्ये पोलिसांनी ढाणी येथील रहिवाशी इंद्राचा प्रियकर दीपक उर्फ दीपूला अटक केली आहे. दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. इंद्रा विवाहीत होती. दीपकने या वर्षी सप्टेंबरमध्ये इंद्राला पळवून नेले होते. परंतु, काही दिवसांनंतर दोघेही घरी परतले.

फोन करून घरी बोलवले आणि केली हत्या...
एसआय आमराराम बिश्नोई यांनी सांगितले की, इंद्रा 27 ऑक्टोबरला सारसरी जाणार होती. दीपक तिला आपल्यासोबत ठेऊ इच्छीत होता. इंद्राने ऐकले नाही, तर दीपकने तिला 26 ऑक्टोबरला दूपारी फोन करून घराबाहेर बोलवले. बाईकवरून तिला सातलावास डिस्कॉम जीएसएस य़ेते बनवण्यात आलेल्या खोलीवर घेऊन गेला. तिथे दोघांमध्ये वाद झाला. यावरून दीपकने गळा दाबून इंद्राची हत्या केली. तेथून मृतदेह पोत्यात बांधून मेडताच्या बाहेरील जोधपूर रोडवर आणला, गुरूदेव कॉलनीजवळ बाइकमधील पेट्रोल काढून दीपकने इंद्राचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

जीएसएसवर होती ये-जा, त्यामुळे तेथे घडवली घटना..
दीपकचे वडील डिस्कॉममध्ये  कर्मचारी आहे आणि सातलावास जीएसएसवरही कार्यरत आहेत. त्यामुळे दीपकपण जीएसएसवर काम करत होता. त्यामुले तेथे त्याचे येणे-जाणे होते. त्यामुळे तेथील खोलीत त्याने इंद्राची हत्या केली.
 
पुढील स्लाइवडर पाहा आणखी फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...