आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणात अडकवून पोलिसही करतात ब्लॅकमेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक - अत्याचाराचाआरोप ठेवून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीचा भंडाफोड करून जिंदच्या दांपत्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी हिस्सारच्या महिला पुरुषांनाही अटक केली आहे. चौकशीमध्ये हरियाणातील अनेक जिल्ह्यांतील कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. टोळीने रोहतक, भिवानी आणि कुरुक्षेत्रसह अर्धा डझन जिल्ह्यांमध्ये बलात्काराचा खोटा आरोप लावून तीस हजारपासून पाच लाखांपर्यंत पैसे उकळल्याची १६ प्रकरणे समोर आली आहेत. पोलिसांनी भिवानीचे एसएचओपासून जिंदच्या हेड कॉन्स्टेबलसह अनेकांची नावे समोर आणली. अटकेतील आरोपींची चौकशी केल्यावर टोळीमध्ये वकिलांव्यतिरिक्त पोलिस अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. पोलिस अधीक्षक राकेशकुमार आर्य यांनी चौकशीसाठी उपअधीक्षक डॉ. रवींद्र यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...