आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे सत्यः 2 बायका फजिती ऐका, बातम्या अपहरणाच्या, पण निघाले भलतेच, बसेल धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली पत्नी मधू (डावीकडे) आणि दुसरी पत्नी मंजू (उजवीकडे). इन्सेटमध्ये मुलगी लाडो. - Divya Marathi
पहिली पत्नी मधू (डावीकडे) आणि दुसरी पत्नी मंजू (उजवीकडे). इन्सेटमध्ये मुलगी लाडो.
रायपूर (छत्तीसगड)- येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतून पाच वर्षांची मुलगी अचानक गायब झाली. पोलिसांनी तब्बल 30 तास तिचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. अखेर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी दिसली. वयाने जरा मोठा मुलगा तिला सायकलवर घेऊन जात होता. हे नक्कीच अपहरणाचे मोठे प्रकरण असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. पण संपूर्ण हकिकत समजल्यावर मुलीच्या वडीलांच्या दोन बायका असल्याचे गुपित उघडकीस आले.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- लाडो असे या पाच वर्षीय मुलीचे नाव आहे. तिच्या आईचे नाव मंजू साहू आहे. एक दिवस लाडो अचानक गायब झाली.
- मुलगी गायब झाल्याने पोलिसांनी लगेच शोध मोहिम सुरु केली.
- कॉलनीच्या मेन गेटसह इतर सोसायट्यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले.
- हिरापूर पुलाजवळ एका 12-13 वर्षांचा मुलगा एक मुलीला सायकलवर बसवून नेताना दिसला.
- पोलिसांना अपहरणात एखाद्या कसलेल्या टोळीचा हात असल्याचा संशय आला.
- त्यानंतर पोलिसांनी शहरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तेव्हा पोलिसांना ते घर सापडले जेथे लाडो होती.
कुठे होती लाडो
- पोलिस जेव्हा या घरात गेले तेव्हा लाडो टीव्ही बघत होती.
- फुटेजमध्ये दिसणारा मुलगा आणि तिची आईपण तेथेच होते. चौकशी केल्यावर सत्य समोर आले.
- या मुलाचे नाव हर्ष आहे. लाडोचा तो सावत्र भाऊ आहे. खेळण्यासाठी तो बहिणीला घरी घेऊन आला होता. अपहरण करण्याचा त्याचा उद्देश नव्हता.
वडीलांचे गुपित झाले उघड
- लाडोच्या वडीलांचे नाव राजकुमार आहे. त्याचे पहिले लग्न मधूसोबत झाले होते. हर्ष त्यांचा पहिला मुलगा आहे.
- त्यानंतर राजकुमार मंजूच्या प्रेमात पडले. त्यांनी मंजूसाठी कबीरनगरमध्ये घर घेतले. दोघांना लाडो नावाची मुलगी होती.
- मंजूला पहिल्या पत्नीची कल्पना होती. पण मधूला हे माहिती नव्हते.
- विशेष म्हणजे राजकुमार दुसऱ्या पत्नीलाही मधूच्याच नावाने बोलवायचा.
- राजकूमार जेव्हा मधूला भेटायला जायचा तेव्हा लाडोला सोबत घेऊन जायचा. मधू विचारायची तेव्हा ही मित्राची मुलगी आहे असे सांगायचा.
- मधूच्या घरी गेल्यावर लाडो आणि हर्ष दोघे खेळायचे. या दरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली.
- काही दिवसांपूर्वी हर्षला समजले होते, की लाडो त्याची सावत्र बहिण आहे.

राजकुमार होता दिल्लीला
- मुलगी जेव्हा गायब झाली तेव्हा राजकुमार दिल्लीला होता.
- लाडोचे अपहरण झाल्याचे समजल्यावर तो मंजूच्या घरी परतला. पोलिसांनी त्याला हर्ष आणि लाडोचा व्हिडिओ दाखवला. पण त्याने हर्षला ओळखले नाही.
- त्याला वाटले होते, की पोलिसांची आपण दिशाभुल करु. पोलिस निघून गेल्यावर लाडोला घरी घेऊन येऊ. बायकोला सांगू, की मी लाडोला शोधले.
- पण त्यापूर्वीच पोलिसांनी लाडोला शोधून काढले. आणि राजकुमार बिंगही फुटले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनेशी संबंधित फोटो.... अखेरच्या स्लाईडवर बघा पोलिसांना सापडलेले सीसीटीव्ही फुटेज....
बातम्या आणखी आहेत...