आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Firing Lathicharge On Pratikar Yatra Varanasi Tension Increases

वाराणसी : प्रतिकार मोर्चाला हिंसक वळण, कलम 144 लागू, शाळेला सुटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमावाने केलेली जाळपोळ - Divya Marathi
जमावाने केलेली जाळपोळ
वाराणसी - येथे 23 सप्‍टेंबर रोजी मूर्ती विसर्जनाच्‍यादरम्‍यान पोलिसांनी लाठीमार केला होता. याचा निषेध म्‍हणून साधू-संतांनी सोमवारी प्रतिकार मोर्चा काढला. मात्र, हा मोर्चा गौदिलिया येथे पोहोचताच जमावाने दगडफेक केली. शिवाय वाहने पेटवून दिले. परिणामी, परिस्‍थ‍िती नियंत्रणात आण्‍यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. त्‍यामुळे तणाव वाढला आहे.
संचारबंदी हटवली
कोतवाली, लक्सा, चौक, दशाश्मेध या पोलिस ठाण्यांच्या परिसरात लावलेली संचारबंदी काढण्‍यात आली. याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पोलिस अधीक्षक आकाश कुलहरी यांना कॉल करून परिस्‍थ‍ितीचा आढावा घेतला आणि शांतता व सुव्‍यवस्‍थेसाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन केले. दरम्‍यान, शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्‍यात आली.
नेमके काय झाले होते
23 सप्‍टेंबरला गंगा नदीत गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी साधू आडून बसले होते. त्‍यांच्‍यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. त्यात शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे शिष्य अविमुक्तेशवरानंद व त्यांच्या श्रीवि्द्यामठात शिकणारे अनेक शिष्य जखमी झाले होते. लाठीमार सुरू होता तेव्हा काही काळ दगडफेकही झाली. त्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात गणेश मूर्तींचे लक्ष्मीकुंडात विधीवत विजर्सन केले. वाराणसी येथे गंगा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी अविमुक्तेशवरानंद यांनी आग्रह धरला होता. परंतु पोलिसांनी त्यास नकार देत कुंडात विसर्जन करण्याचा आग्रह धरला. साधूंनी त्याला नकार दिल्यानंतर प्रकरण गंभीर बनले. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. पोलिस लाठ्या मारत होते. तरीही अविमुक्तेशवरानंद व त्यांचे शिष्य ठाम होते. एक साधू बेशुद्ध पडला होता. त्यामुळे लोकांनी आक्रमक होत निर्दशने केली. तसेच दगडफेकही झाली. त्यानंतर पोलिसांनी जोरदार लाठीमार करत साधू व जमावाला दूरपर्यंत पिटाळून लावले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...