आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Getting Ready For Tow Day Camp Of Bjp In Surajkund, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोख सुरक्षा व्यवस्थेत मोदींनी घेतला खासदारांचा क्लास, सूरजकुंडला आले होते सुरक्षा छावणीचे रूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सूरजकुंड शिबीरामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी आले असता त्यांची अशी करण्‍यात - Divya Marathi
(सूरजकुंड शिबीरामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी आले असता त्यांची अशी करण्‍यात
फरीदाबाद - भाजपचे नवनिर्वाचित खासदारांसाठी सूरजकुंडमध्‍ये प्रशिक्षण शिबीरात प्रत्येक ठिकाणी पोलिसाची चोख सुरक्षा व्यवस्था करण्‍यात ठेवण्‍यात आली होती. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळीच हेलिकॉप्टरने आले. त्यांना सूरजकुंडच्या एका हॉटेलमध्‍ये आणण्‍यात आले. पंतप्रधान ज्यामार्गा वरून जात होते त‍िथे शेकडो पोलिस तैनात होते. या व्यतिरिक्त एसपीजीचेही जवान होते. जवळ-जवळ दोन तास खासदाराबरोबर संवाद साधल्यानंतर पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले. प्रशिक्षण शिबीर रविवारीही चालू राहणार आहे. मोदी गेल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्‍वास घेतला. शिबीर पूर्ण होईपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असेल, असे पोलिस आयुक्त अरशिंदर सिंह यांनी सांगितले.

हॉटेलच्या चारीबाजूने सुरक्षा व्यवस्था
पीएम मोदी ज्या ठिकाणी थांबणार त्या राजहंस हॉटेलला सुरक्षा जवानाच्या छावणीचे रूप आले होते. पर्वताच्या उंच टेकड्यांवरही पोलिस व्यवस्था करण्‍यात आली होती. या व्यतिरिक्त रस्त्याच्या ठिकठिकाणी सुरक्षेसाठी अडथळे तयार करण्‍यात आले होते. राजहंस हॉटेलमध्‍ये खासदारांची खाण्‍या-पिण्‍यापासून राहण्‍याची उत्कृष्‍ट व्यवस्था करण्‍यात आली आहे. प्रशिक्षण शिबीरात रविवारी भाजपचे वरिष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी येणार असल्याचे सांगितले जाते. भाजपचे अनेक वरिष्‍ठ नेते नव्या खासदारांना टिप्स देणार आहेत.

पीएम येणार यासाठी करण्‍यात आलेल्या चोख सुरक्षेसंबंधित स्लाइड पाहा पुढे ....