मोगा - पंजाबमधील मोगा येथे धावत्या बसमध्ये छेडछाड करून मायलेकीला फेकून दिल्याप्रकरणावरून कॉंग्रेस रस्त्यावर उतरला आहे. पंजाब सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने आज (शनिवारी) रेल्वे रोको आंदोलन केले. बसच्या मालकावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृत मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाहीत, असे पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. ही बस पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांची कंपनी 'ऑरबिट अॅव्हिएशन'ची आहे. सरकार सरकारतर्फे उपमुख्यमंत्री बादल यांच्या कंपनीच्या बस आणि कर्मचार्यांना पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.
शिक्षण मंत्र्यांची मुक्ताफळे...
दुसरीकडे, पंजाबचे शिक्षण मंत्री सुरजीत सिंग राखरांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'कोणीही अपघात थांबवू शकत नाही, जे काही झाले ते परमेश्वराची इच्छा होती.' असे उथळ वक्तव्य करून राखरांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. राखरांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुंनी टिकेची झोड उठली आहे.
पोस्टमॉर्टम को राजी नहीं हुए परिजन
डीआयजी, उपायुक्त , कृषीमंत्र्याचा पीएच्या समितीने पीडित कुटुंबीयासोबत तब्बल दोन तास चर्चा केली. परंतु तोडगा निघू शकला नाही. मृत मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम तसेच त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू दिले जाणार नसल्याचा इशारा पीडितेचे वडील सुखदेव सिंग दिला आहे. सरकारतर्फे नुकसान भरपाईच्या रुपात मिळणारे 20 लाख रुपये देखील सुखदेव सिंग यांनी फेटाळून दिले आहे. बस मालक उपमुख्यमंत्री बादलांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुखदेव सिंग यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चालक रणजीत सिंग, कंडक्टर सुखविंदर सिंग, हेल्पर अमर राम आणि गुरदीप सिंगला कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सर्व अारोपींना गुन्हा कबूल केला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पंजाब आणि दिल्ली सुरु झालेल्या आंदोलनाचे छायाचित्रे...