आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमांशू दीक्षितच्या लव्ह लाईफचा असा झाला END, लिहिले- मेल्यावरही प्रेम करत राहिल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशी (उत्तर प्रदेश)- आग्र्याच्या ताजमहालात तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली. त्यात सांगितले, की मी मेल्यावरही तुझ्यावर प्रेम करत राहील. आय लव्ह यू. मी मेल्यावर माझ्या पत्नीला त्रास देऊ नका.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- हिमांशू दीक्षित असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो कानपुरचा रहिवासी आहे. सध्या तो अग्र्याच्या ताजमहालात तैनात होता.
- त्याची पत्नी शुभा द्विवेदी औरेया जिल्ह्यातील आहे. ती ललितपूर येथे शासकीय शिक्षिका होती. ती भाड्याने खोली करुन राहत होती.
- दोघांनी प्रेम विवाह केला होता. आधी दोघांच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. पण तो नंतर मावळला होता.
- विकएंडला किंवा सुट्यांमध्ये हिमांशू पत्नीला भेटायला जायचा.
- शेजाऱ्यांनी सांगितले, की हिमांशू शनिवारी पत्नीला भेटायला आला होता. यावेळी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर तिला घरात कोंडून निघून गेला.
- शुभाने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला. या दरम्यान हिमांशू रेल्वे स्टेशनवर गेला होता. त्याने तेथेच विष प्राशन केले.
- जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हिमांशूने हे लिहिले सुसाईड नोटमध्ये
मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आलाय. अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, की माझी पत्नी शुभा दीक्षित जेथे कुठे असेल ती खुश राहावी. माझ्या आत्महत्येसाठी मी स्वतः जबाबदार आहे. माझ्या आईवडीलांची रक्षा करा. शुभा, मी तुझ्यावर मेल्यानंतरही प्रेम करेल. आय लव्ह यू.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...