आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हा नोंद करण्यास नकार देणा-या पोलिस निरीक्षकाला गोव्यात समाजसेवेची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - कोठडीतील मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याबद्दल गोवा पोलिस तक्रार प्राधिकारणाने (जीएसपीसीए) पोलिस निरीक्षकास ग्रामपंचायतीमध्ये समाजसेवा करण्याची शिक्षा बजावली आहे. ड्यूटीवर नसताना समाजसेवेची शिक्षा पूर्ण करावी लागेल.

कॅप्रियानो फर्नाडिस या एनआरआयचा 15 जानेवारी 2011 रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिस निरीक्षक विश्वेश करपे यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. करपे कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्याच्या कोठडीत कॅप्रियानोचा मृत्यू झाला होता.

करपे यांना दहा ग्रामपंचायतीमधील सदस्यांना तक्रार निवारणाची प्रक्रिया,उद्दिष्ट, कार्याची माहिती देण्यास जीएसपीसीएचे अध्यक्ष आर.एम.एस. खांडेपारकर यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत वेगवेगळ्या तालुक्यातील असाव्यात तसेच त्यातील निम्म्या उत्तर गोव्यातील तर निम्म्या दक्षिण गोव्यातील असाव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.