आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षकांनी कार्यालयाच्या खात्यात भरले 52 लाख, अायकर खात्याची नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - नोटाबंदीच्या काळात पकडण्यात आलेल्या ५२ लाखांच्या नोटा पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभाग कार्यालयाच्या खात्यात भरल्या. तेव्हा आयकर विभागाचे अधिकारी पोलिस निरीक्षकांच्या घरी या नोटा शोधण्यासाठी येऊन धडकले. पोलिस अधिकाऱ्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सगळे प्रकरण उघडकीस आले. 
 
नोटाबंदीच्या काळात भरण्यात आलेले लाखाे रुपये पाेलिस निरीक्षक शंकर चौधरी यांनी बँक ऑफ इंडियात जमा केले होते. या चलनासोबत चौधरी यांनी स्वत:चे पॅनकार्ड जोडले. हे बँक खाते “डिटेक्शन ऑफ क्राइम’ नावाने पोलिस निरीक्षक शंकर चौधरी व उपायुक्त दीपन भद्रन यांच्या दोघांच्या नावे आहे.  
 
ही तर आयटी विभागाची चूक 
आयकर अधिकारी पॅनकार्डच्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षकांच्या घरी पोहोचले. यावरून वाद निर्माण झाला. अहमदाबादेतील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजदीप सिंह झाला यांनी सांगितले : शंकर चौधरी यांच्या घरी पोलिस आयकर अधिकाऱ्याने जाणे चुकीचे आहे. पॅनकार्डावरील माहितीच्या आधारे बँक खात्याची तपासणी नीट न करता, आयकर अधिकारी थेट त्यांच्या घरी गेले. कारवाईतील जप्त करण्यात आलेली रक्कम पोलिस अधिकाऱ्यांनी खात्यात भरली. हे त्यांच्या कार्यालयीन कामकाजात मोडते. त्याची नोटीस कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवण्यात यायला हवी होती.
 
बातम्या आणखी आहेत...