आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकारी म्हणाला कॉम्प्रमाइज तर करावे लागेल, रात्री तुझ्या घरी येतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- राजस्थानमधील एका पोलिस अधिकाऱ्याने असे काय कृत्य केले की त्यामुळे खाकी वर्दीवर डाग लागला. जोधपूर शहरातील राजीव गांधी नगर येथील कमलदान चारण नावाच्या या अधिकाऱ्याने एका व्यक्तीला अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीच्या पत्नीकडे त्याने शरीरसुखाची आणि पैशांची मागणी केली. 

सौदर्य आणि जवानीविषयी बोलायचा हा अधिकारी

- नवऱ्याच्या अटकेनंतर ही एक महिला या अधिकाऱ्याच्या संपर्कात आली होती. त्यानंतर तो तिच्यासोबत व्हॉट्सअपवर प्रेमाच्या गोष्टी करु लागला.
- त्याने या महिलकडे 15 लाखाची गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये कॅश घेतले. त्यानंतर एक लाखाचे चेकही घेतला. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यानंतर एसीबीकडे तक्रार केली. 
- मंगळवारी गस्तीपूर्वी हा पोलिस अधिकारी या महिलेकडे गेला. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला एक लाखाच्या चेकसह अटक केली.

महिलेने नकार दिल्यानंतरही पोहचला होता तिच्या घरी

- अंमली पदार्थाच्या एका प्रकरणात या महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. महिला आपल्या पतीला या प्रकरणातून सोडवू इच्छित होती. कमलनाथ मात्र तिचा गैरफायदा घेण्याचा विचार करत होता. 
- त्याने महिलेला दोन लाख रुपये मागितले. त्यानंतर त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक सुरु केले. पतीला सोडवायचे असेल तर कॉम्प्रमाइज करावे लागेल असे सांगत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
- त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला आय लव्ह यू असे मॅसेज पाठवले. मागील 3 दिवसांपासून तो सुट्टीवर होता.
- रात्री साडेअकरा वाजता महिलेच्या घरी गेला व तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. आईची तब्येत खराब असल्याचे सांगत तिने त्याला टाळले.
 
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...