आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूममध्ये येण्यापूर्वी त्याने विचारले जागा तर सुरक्षित आहे का? कॅमेरा तर नाही ना?, मुलगी म्हणाली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवतीने कमलदान याच्याविषयी एसीबीला माहिती दिली. - Divya Marathi
युवतीने कमलदान याच्याविषयी एसीबीला माहिती दिली.
जोधपूर- लाचेसाठी युवतीकडे शरीरसुखाची आणि दोन लाखाची मागणी करणाऱ्या कमलदान चारण याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तुरुंगात पाठवले आहे. दोन दिवसाच्या रिमांड दरम्यान त्याने एसीबीच्या प्रश्नांचे कोणतेच उत्तर दिले नाही. आपण हनी ट्रॅपमध्ये अडकलो असल्याचे तो सांगत आहे. तपासात कमलदान हा हनी ट्रॅपविषयी सावध असल्याचे समोर आले आहे. त्याने या युवतीच्या खोलीत जाण्यापूर्वी तिला या खोलीत कॅमेरा तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली होती. युवतीने खोलीत कॅमेरात नसल्याचे सांगितल्यावरही त्याने खोलीत सगळीकडे नजर फिरवली होती. एसीबीने मात्र आपली कामगिरी चोख बजावत त्याला पकडले.

कमलदानने दिली होती अशी ऑफर

- कमलदान याने अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका व्यक्तीला पकडून तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर त्याने या व्यक्तीच्या पत्नीकडे शरीरसुखाची आणि दोन लाख रुपयांची मागणी केली.
- या व्यक्तीला अटक केल्यानंतर कमलदानने त्याच्या पत्नीशी लंपटपणा सुरु केला.
- पहिल्यादा त्याने या महिलेकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याने एक लाखाचा चेक घेतला. कॅश दिल्यानंतर आपण चेक परत देऊ असे त्याने महिलेला सांगितले.
- मंगळवारी तो या महिलेच्या घरी गेल्यावर एक लाखाच्या धनादेशासह एसीबीने त्याला पकडले.
बातम्या आणखी आहेत...