जयपूर - राज्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यासंदर्भात वारंवार धमक्या येत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. या धमक्या कोण आणि का देत आहे याचा तपास लावण्यात सुरक्षा संस्था अद्यापही अयशस्वी ठरल्या आहेत. या धमक्या ख-या आहेत की, कुणी नाहक यंत्रणेही फिरकी घेत आहे. हेदेखिल यातून कळू शकत नाही.
बुधवारी पुन्हा एकदा अजमेर स्टेशनच्या व्यवस्थापकांना एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये अजमेर दर्गाह आणि रेल्वे स्टेशनला बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी आली आहे. मंगळवारी बाडमेर येथील सर्किट हाऊस मध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचे पत्र देण्यात आले होते. त्यामुळे हे धमकीसत्र थांबायचे नाव घ्यायला तयार नाही असे दिसते. बुधवारी मिळालेली चिठ्ठी ही अर्धी हिंन्दी आणि अर्धी इंग्रजी भाषेत लिहलेली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, धमकीचे पत्र मिळाल्यावर कशी उडाली पोलिसांची झोप..
सर्व फोटो : मोहन थाडा, अजमेर