आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धगधगत्या चितेवर पाणी टाकून बाहेर काढले मृतदेह, समोर आले मुलगी-जावायाचे दुष्कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतियाळा/नाभा- स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरु असताना सायरण वाजत पोलिसांची गाडी येते. धगधगत्या चितेवर पाणी टाकण्यात येते. एका व्यक्तीचे अर्धजळीत पार्थिव बाहेर काढले जाते आणि मृत व्यक्तीची मुलगी आणि जावायाच्या कृत्याचा अखेर भांडाफोड होतो. पतियाळामधील नाभा येथील ही घटना आहे.

पोलिसांनी सांगितले की, भजनसिंग, (मृत व्यक्ती) मुलगी आणि जावाई यांच्यात सुरु असलेले भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण संतापलेला जावाई गुरजंट सिंग काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. गुरजंट सिंग याने पिस्तूल काढून सासर्‍यावर (भजनसिंंग) गोळी झाडली. जागेेवरच भजनसिंगचा मृत्यू झाला. हत्येचे कृत्य लपवण्यासाठी आरोपीने भजनसिंग यांचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव केला. यात पत्नीची मदत घेतली. इतकेच नव्हे तर जावाईने सासर्‍याचे अंत्यसंस्कार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात गावातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून सर्व माहिती दिली.

असा झाला मुलगी-जावायाच्या कृत्याचा भांडाफोड...
- अर्धजळीत पार्थिव बाहेर काढल्यानंतर समजले की, भजनसिंहला मागील बाजूने गोळी लागली होती.
- पोलिसांनी पार्थिव ताब्यात घेतले असून मृत व्यक्तिच्या मुलाच्या तक्रारीवरून आरोपी जावाई गुरजंट सिंगविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

आरोपीच्या घरातून जप्त केली गोळीची कॅप...
- पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या घरातून गोळीची कॅप जप्त करण्यात आली आहे.
- गुरजंट सिंगचा गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरु होता. भजन सिंग वाद मिटवण्यासाठी मुलीच्या घरी आला होता. पण वाद मिटवणेे तर दूरच संतापाच्या भरात गुरजंंट सिंग याने भजनसिंगवर गोळी झाडली. भजनसिंगचा जागेवरच मृत्यू झाला. जावाई आणि मुलीने खोटे नाट्य रचून अपघातामध्ये भजनसिंगचा मृत्यू झाल्याचे घराच्या मंडळीला सांगितले.
- आरोपी गुरजंट सिंग फरार असून पोलिस त्याचा शोध घेेत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...