आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाने रस्त्यावर मुलींना दिली उठाबशा मारण्याची शिक्षा, वाचा काय होती चूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर (झारखंड) - जमशेदपूरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने तीन मुलींना भररस्त्यात कान पकडून उठाबशा मारण्याची शिक्षा दिली. नियम धाब्यावर बसून पोलिसाने मुलींसोबत केलेल्या वर्तणूकीचा निषेध केला जात आहे. पोलिस कर्मचाऱ्याने कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीशिवाय हे कृत्य केले होते. यामुळे मुलींना भररस्तात लाजिरवाण्या शिक्षेला सामोरे जावे लागेल.

काय आहे प्रकरण
- मिळालेल्या माहितीनुसार, गुलमोहर शाळेसमोरुन एका स्कुटीवर तीन मुली जात होत्या.
- पीसीआर व्हॅनमध्ये बसलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना पाहून हटकले आणि व्हॅनमधून खाली उतरला. पोलिसाने स्कुटी थांबवून मुलींना रस्त्यावर उभे केले.
- पोलिस कर्मचाऱ्याने मुलींकडे लायसन्स आणि हेल्मेट कुठे आहे, याची विचारणा केली. वास्तविक घर जवळ असल्याने मुलींनी हेल्मेट घातले नव्हते.
- पोलिस कर्मचाऱ्याने बराचवेळ मुलींना रस्त्यावर उभे करुन नंतर त्यांना उठबशा मारण्याची शिक्षा देऊन सोडले.

नियम काय सांगतो ?
- नियमानुसार, रस्त्यावरील वाहणांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी करु शकतो.
- उपनिरीक्षकाच्या देखरेखीत पोलिस कर्मचारी गाड्यांची तपासणी करु शकतात, मात्र येथे पोलिस कर्मचाऱ्याने सर्वच नियम धाब्यावर बसवले होते.
- वर्दीचा रुबाब दाखव पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या या कृत्यावर टीका होत आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो
सर्व फोटो - बिजेंद्र कुमार
बातम्या आणखी आहेत...