आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Quizzes Rajasthan Minister Over Rape Allegations

बलात्‍काराच्‍या आरोपात अडकलेल्‍या राजस्‍थानच्‍या मंत्र्याचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्‍कार केल्‍याचा आरोप असलेले राजस्‍थानचे खादी ग्रामोद्योग मंत्री बाबूलाल नागर अडचणीत येण्‍याची शक्‍यता आहे. पोलिसांच्‍या विशेष पथकाने नागर यांच्‍या शासकीय निवासस्‍थानी त्‍यांची अर्धा तास चौकशी केली. पोलिसांनी पीडित तरुणीलाही या ठिकाणी नेले होते. तिने बलात्‍कार झाला ती खोलीही पोलिसांना दाखविली. यानंतर खोलीला सील लावण्‍यात आले. फॉरेन्सिक पथक या खोलीची तपासणी करणार आहे.

नागर यांच्‍याविरुद्ध पक्षातून राजीनाम्‍याची मागणी करण्‍यात येत आहे. कॉंग्रेसचे प्रभारी गुरुदास कामत यांनी प्रदेशाध्‍यक्ष चंद्रभान यांच्‍याकडून अहवाल मागवला आहे. कॉंग्रेसचे हायकमांडही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...