आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या पार्टीवर पोलिसांचा छापा, 29 विद्यार्थी अटकेत; १५ तरुण आणि १४ तरुणींचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - येथील रंगात आलेल्या दारूच्या पार्टीवर अचानक पोलिसांनी छापा घालून २९ तरुणांची झिंग उतरवली. हे सर्व तरुण नॅशनल डिझाइन ऑफ फॅशन इन्स्टिट्यूट (एनआयटी)चे विद्यार्थी आहेत. या पार्टीत १५ मुले आणि १४ मुलींचा सहभाग होता. त्यापैकी एक परदेशी असून इतर सर्व देशांतील अन्य राज्यातील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फ्लॅटमध्ये रात्री उशिरापर्यंत गोंगाट व गोंधळाचा आवाज ऐकू येत होता. तेथील रहिवाशांनी फोन करून पोलिसांना माहिती दिली. 
 
पोलिस जेव्हा फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तेथे दारूची पार्टी रंगात आलेली दिसली. या पार्टीत सहभागी झालेल्या २९ तरुणांना पोलिसांनी अटक केली. याची ओळख पटली असून ते सर्वजण नॅशनल डिझाइन ऑफ फॅशन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असल्याचे समजले. यातील सात जण मुंबई व पुण्यातील आहेत, तर इतर मुले उत्तर प्रदेश, जयपूर, दिल्ली, केरळ, उत्तराखंड, तामिळनाडू, हरियाणा, ओडिशा आणि छत्तीसगडचे आहेत, तर एक तरुणी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गची रहिवासी आहे.  
 
तरुणींची महिला पोलिसांची मागणी 
लाेकांच्या तक्रारीवरून पोलिस फ्लॅटवर पोहोचले. तेथे दारूच्या पार्टीत सहभागी तरुणींनी आपली झडती घेण्यासाठी महिला पोलिस व अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली. तसेच पोलिस ठाण्यात त्यांच्याशिवाय येणार नाही, असे ठणकावले. विद्यार्थी मागणीवर अडून बसल्याने महिला पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर या तरुणी पोलिस ठाण्यात आल्या.
 
बातम्या आणखी आहेत...