आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Raids Jammu Ranji Cricketers Room In Search Of Terrorist

दहशतवाद्याच्‍या शोधासाठी जम्‍मू-काश्मिर रणजी संघातील क्रिकटपटुंच्‍या खोल्‍यांची झडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्‍मू/नवी दिल्‍ली- जम्‍मू पोलिसांनी एका संशयित दहशतवाद्याचा शोध घेण्‍यासाठी जम्‍मू-काश्मिरच्‍या रणजी क्रिकेट संघातील खेळाडूंची मध्यरात्री चौकशी केली. या खेळाडुंना पोलिसांनी मध्‍यरात्री जागवून चौकशी केली. हे खेळाडू जम्‍मू येथे एका हॉटेलमध्‍ये मुक्‍कामाला होते. त्या हॉटेलच्या आसपास एक दहशतवादी असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्‍यामुळे हॉटेलच्‍या प्रत्येक खोलीची तपासणी करत खेळाडूंचीही चौकशी केली.

जम्‍मू-काश्मिरचा हैदराबादसोबत रणजी करंडक स्‍पर्धेचा सामना सुरु होता. त्‍यासाठी खेळाडू हॉटेलमध्‍ये थांबले होते. मंगळवारी मध्‍यरात्रीनंतर पोलिसांनी अचानक हॉटेलवर छापा मारला. पोलिसांनी सर्व खेळाडुंची चौकशी केली. त्‍यांच्‍या खोलीची तपासणीही केली. खेळाडुंना ओळखपत्रहेही दाखविण्‍यास सांगण्‍यात आले.

जम्‍मू-काश्मिरचा खेळाडू शमीउल्‍ला बेग याने बुधवारी सकाळी हा प्रकार फेसबुकवरुन शेअर केला. संघाचा कर्णधार परवेझ रसुलनेही घटनेला दुजोरा दिला आहे. हा नियमित तपासणीचा भाग असल्‍याचे त्‍याने सांगिते.

खेळाडू नाराज... वाचा पुढे...