आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळत्या चितेवरून पोलिसांनी काढला विवाहितेचा देह, 3 वर्षांची चिमुकली करत होती आक्रोश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेला सासरच्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप आहे. - Divya Marathi
महिलेला सासरच्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप आहे.
कौशांबी - येथील पिपरी परिसरात एका महिलेच्या मृतदेहाला पोलिसांनी जळत्या चितेवरून काढले. महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की तिच्या सासरच्यांनीच तिची मारहाण करून हत्या केली आणि नंतर कोणालाही न कळवता गुपचूप तिचा अंत्यसंस्कार करायला जात होते. पोलिसांनी तिच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टेमला पाठवून हुंडाबळीचा गुन्हा नोंदवला आहे.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- करारी परिसरातील अर्का गावची गुडियादेवी (24) चे लग्न पिपरीमधील दिलीप कुमारशी 5 वर्षांआधी 2012 मध्ये झाले होते.
- शनिवारी रात्री विवाहितेला प्रचंड मारहाण करून तिचा खून करण्यात आला. रविवारी सकाळी माहेरच्या लोकांना न कळवताच मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत घेऊन गेले.
- मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून माहेरच्या लोकांनी अगोदर पोलिसांना माहिती दिली आणि मग स्वत: स्मशानभूमीवर पोहोचले.
- घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी कसेबसे जळत्या चितेवरून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांना तेथे पाहताच महिलेच्या नवऱ्यासहित इतर लोक फरार झाले.
 
हुंड्याची करत होते मागणी
- मृत महिलेचे वडील नथनलाल म्हणाले, लग्नानंतर सासरच्या लोकांनी बाइक आणि नगदी 50 हजार रुपयांसाठी गुडियाला त्रास द्यायला सुरुवात केली होती.
- मागणी पूर्ण न झाल्याने शनिवारी रात्री विवाहितेला प्रचंड मारहाण करून तिचा खून केला.
- रात्री उशिरा आम्ही पोलिसांत तिचा नवरा दिलीप कुमार, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध तक्रार दिली आहे.
 
आईला उठवू पाहत होती चिमुकली
- गुडियाची 3 वर्षांची मुलगी आईचा मृतदेह पाहून खूप रडत होती. यादरम्यान अनेकदा तिने आपल्या आईला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. तिला वाटायचे की आई झोपलेली आहे.
 
काय म्हणतात पोलिस?
- पिपरीचे पोलिस अधिकारी अर्जुन सिंह म्हणाले, मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
- आरोपींचा शोध सुरू असून सध्या सर्व फरार आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर काही बाबी स्पष्ट होतील.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे हृदयद्रावक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...