कानपूर- उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाला हादरून टाकणार्या ज्योती हत्याकांडातील प्रमुख आरोपी पीयूषसह सर्व आरोपींना 24 तासांचा रिमांड सुनावण्यात आला आहे. या 24 तासांत पोलिस सर्व आरोपींना एकत्र बसवून त्यांची कसून चौकशी करणार आहे. विशेष म्हणजे या चौकशीचे व्हिडिओ शुटिंगही होणार आहे.
यापूर्वीही सर्व आरोपींची चौकशी करण्यात आली होती. परंतु त्यात आरोपींनी अर्धवट माहिती दिल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. त्यामुळे पीयूषसह सगळ्या आरोपींना किमान 24 तासांचा रिमांड मिळावा, यासाठी पोलिसांनी कोर्टाकडे मागणी केली होती. पोलिसांची ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे.
कोर्टाने रिमांड सुनावल्यानंतर पोलिसांनी मध्यवर्ती तुरुंगातून सर्व आरोपींना पोलिस लाइनमध्ये आणले. या पार्श्वभूमीवर पोलिस लाइनमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस अधिकार्यांची अर्धा तास चर्चा चालली. नंतर एक-एक करून सर्व आरोपींना तुरुंगाबाहेर आणले. कोर्ट परिसरात अनुचित प्रकार घड नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, स्वरूप नगर ठाण्याचे सीओ राकेश नायक यांना निलंबित केल्यानंतर पोलिसांनी सावध पवित्रा घेतला आहे. नायक यांनी आरोपी पीयूष याला लाडाचे जवळ घेतले होते. त्यांच्या कपाळाचा पापा घेतला होता. यावरून राकेश नायक यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. पोलिस लाइनमध्ये पत्रकारांना बंदी घालण्यात आली होती.
(फोटोः आरोपी पीयूष याला रिमांडसाठी नेताना पोलिस)