आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायपूरः सेक्स रॅकेट संशयावरून हॉटेलवर धाड, चेन्नई सुपरकिंग्सच्या चीयर गर्ल्स आढळल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये इंटरनॅशनल सेक्स रॅकेटच्या संशयातून पोलिसांनी हॉटेलमध्ये केलेल्या छापेमारीत चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या चीयर गर्ल्स पकडल्या गेल्या. या सर्व मुली आयपीएलमधील महेंद्रसिंग धोनीच्या सीएसके टीमच्या सामन्यासाठी रायपूर येथे आल्या आहेत.
रायपूर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी अशी माहिती मिळाली की, येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विदेशी युवती आहेत ज्या सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलात छापा टाकला. पोलिसांनी हॉटेलची कसून चौकशी केली असता तीन रूममध्ये नऊ मुली आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्या सर्व मुली आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सच्या चीयर गर्ल्स असल्याची बाब समोर आली. या मुलींजवळ चेन्नई संघाशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. आपल्याला माहित असेलच की, मंगळवारी रात्री चेन्नई आणि दिल्ली यांच्यात रायपूरमध्य सामना खेळवण्यात आला. त्यात दिल्लीने चेन्नईचा 6 गडी राखून पराभव केला आहे.
संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांची धाड-
रायपूर पोलिसचे सीएसपी अंशुमान सिंह सिसोदिया यांनी सांगितले की, एकाने या हॉटेलमध्ये संशयास्पद हालचाली वाढल्याची माहिती दिली होती. माहितीनुसार तेथे पाळत ठेवून एक पथक पाठवण्यात आले. हॉटेलच्या तीन रूममध्ये तीन-तीन युवती थांबल्या होत्या व मुलीच्याच एका रूममध्ये त्यांचा मॅनेजर थांबला होता. मॅनेजरचीही चौकशी करण्यात आली. हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटसारखी स्थिती आढळून आली नाही. मात्र विदेशी युवती आढळून आल्याने पोलिसांनी सेक्स रॅकेटचा संशय व्यक्त केला. मात्र, पोलिसांना काहीच आढळून आले नाही.
बातम्या आणखी आहेत...