आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police, Responsible, Telangana International Player Hodhiyarsinhas Death,

पोलिसांनी रेल्वेतून फेकल्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कासगंज- तलवारबाजीचा राष्ट्रीय खेळाडू होशियारसिंह उर्फ रॉकी (२३) याला धावत्या रेल्वेतून जीआरपीएफच्या जवानाने ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच रेल्वेतून प्रवास करत असलेल्या आजारी पत्नीची विचारपूस करण्यासाठी रॉकी महिला डब्यात गेला होता. या डब्यात जीआरपीने त्याला लाच मागितली होती. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रॉकीने २००५ मध्ये केरळमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजीत कांस्य पदक जिंकले होते. होशियारसिंह हा पत्नी ज्योती आणि आई शशी यांच्यासोबत कासगंजला आला होता. तेथे त्याच्या सात महिन्यांच्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम होता. परतताना महिलांच्या डब्यात बसलेल्या त्याच्या पत्नीची तब्येत बिघडली. त्यामुळे तो तिला पाहण्यासाठी गेला. तेथे त्याचा दोन शिपायांशी वाद झाला. जीआरपीच्या दोन पोलिसांनी महिलांच्या डब्यात बसण्यासाठी त्याच्याकडे २०० रुपये लाच मागितली होती. त्याने नकार दिल्याने दोन्ही शिपायांनी होशियारला चालत्या रेल्वेतून फेकून दिले. त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्योतीने सांगितले की, गाडी थांबल्यानंतर संतप्त प्रवाशांनी शिपायांना पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण बुकिंग क्लार्कने त्या दोघांना तेथून पळून जाण्यासाठी मदत केली. याप्रकरणी बुकिंग क्लर्क आणि दोन्ही शिपायांच्या विरोधात गैरहेतूने केलेल्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही शिफाई फरार आहेत.

दरम्यान, जीआरपीनुसार, स्थानक प्रमुख आणि गार्डने लेखी जबाब दिला आहे की, धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात पाय घसरल्याने होशियारचा मृत्यू झाला. गार्डने रेल्वे थांबवली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.