आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Revealed Detail Plan Of Trapping Girls By Asaram Bapu

असा होता कटः पीडितेचे येणे निश्चित झाल्‍यानंतर आसाराम थांबले जोधपूरमध्‍ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- लैंगिक शोषणाच्‍या आरोपात अडकलेल्‍या आसाराम बापूंच्‍या लीला हळूहळू जगासमोर येत आहेत. पोलिसांच्‍या तपासात त्‍यांच्‍या कारस्‍थानांची संपूर्ण माहिती उघड झाली आहे. आसाराम बापूंसाठी मुलगी हेरण्‍यात आली. ती जोधपूरला येण्‍याचे निश्चित झाल्‍यानंतर पुढची योजना तयार करण्‍यात आली. आश्रमाऐवजी मणाईच्‍या फार्म हाऊसवर जाण्‍याचे ठरविण्‍यात आले.

आसाराम बापू, सेवक शिवा आणि वॉर्डन शिल्‍पी यांच्‍या झालेल्‍या चर्चेच्‍या आधारावर पोलिसांनी हा घटनाक्रम जोडला आहे. पोलिसांच्‍या माहितीनुसार, आसाराम बापूंचा जोधपूरमध्‍ये थांबण्‍याचा कार्यक्रम नव्‍हता. परंतु, पीडित मुलगी जोधपूरला येणार असल्‍याचा शिल्‍पीने निरोप दिल्‍यानंतर फार्महाऊसवर जाण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. आसाराम बापूंनी थेट शिल्‍पीसोबत चर्चा केली नाही. संपूर्ण संवाद शिवाच्‍या माध्‍यमातून व्‍हायचा. शिवाने चौकशीत या सर्व गोष्‍टी पोलिसांना सांगितल्‍या.

कसा होता अल्‍पवयीन मुलीला फसविण्‍याचा संपूर्ण प्‍लॅन... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...