आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला सोडून प्रियकरासोबत राहात होती गर्लफ्रेंड, प्रेग्नेंट झाली तर असा सोडवला पिच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरसा (हरियाणा) - हरियाणातील सिरसा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सापडलेली गर्भवती महिलेच्या मृतदेहाचे गुढ पोलिसांनी दोन दिवसांमध्येच सोडविले आहे. पोलिसांनी गर्भवतीची हत्या करणाऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, प्राथमिक तपासात समोर आले की लव्ह अफेअरमध्ये 25 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे.
कुत्र्यांनी उकरून काढला होता मृतेदह
- शेतकरी सुशील पीकाची कापणी करण्यासाठी रविवारी मजुरांना घेऊन शेतात आले होते.
- यावेळी जमीनदार दानाराम यांच्या शेतातून त्यांना दुर्गंधी येऊ लागली.
- त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर शेतातील उभ्या पीकांमध्ये कुत्रे जमीन उकरत होते.
- शेतकरी सुशील आणि त्यांच्या सोबत आलल्या मजूरांनी जवळ जाऊन पाहिले तर ते समोरील दृष्य पाहु ते भयभीत झाले. कुत्र्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यातून एक हात बाहेर आलेला होता.
- शेतकऱ्याने या घटनेची माहिती तत्काळ सरपंच आणि शेतमालकाला दिली.
- शेतात मृतदेह सापडल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी झाली.
पिच्छा सोडवण्यासाठी प्रियकराने केली हत्या
- पोलिस चौकशीत समोर आले, की शेतमालक दानाराम यांचा मोठा मुलगा एका विवाहित महिलेवर प्रेम करतो आणि तिच्यासोबत डबवाली येथे राहातो.
- पोलिस तरुणाचा शोध घेण्यासाठी डबवाली येथे पोहोचले तेव्हा दोघेही तिथे नव्हते. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरु केला आणि शेतमालकाचा मुलगा जगतपाल याला 48 तासांत पकडण्यात आले.
- जगतपाल याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने हत्येचा खुलासा केला. जगतपालने सांगितले की त्याचे पंजाबमधील विवाहिता अमृत कौरसोबत प्रेमसंबंध होते.
- तीन मुलांची आई अमृत कौर पतीला सोडून जगतपालसोबत राहात होती. या दरम्यान ती गर्भवती राहिली तेव्हा तिने जगतपालवर लग्नासाठी दबाव वाढविला होता.
- जगतपालने कबूल केले की 28 सप्टेंबर रोजी त्याने अमृत कौरला शेत दाखवण्याच्या बहाण्याने गावी आणले होते.
- येथे त्याने अमृत कौरच्या तोंडावर कपडा टाकून विटेने ठेचून तिची हत्या केली. तिची ओळख मिटवण्यासाठी चेहऱ्यावर अनेक वार करण्यात आले आणि मृतदेह खड्यात पुरला.
- ठाणे अंमलदार दलेराम यांनी सांगितले, की आरोपीला अटक करण्यात आली आहे. आता त्याला कोर्टात हजर करुन रिमांड मागतिला जाणार आहे, या घटनेती आणखी बारकाव्यांचा शोध घेतला जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या जगतपालने कसा कबूल केला गुन्हा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...