आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Stops Protesters On Their Way For Tral March Clash Between Police Protest

J&K: मसरतच्या अटकेनंतर आंदोलक पोलिसांमध्ये उडाली चकमक, 14 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - पाकिस्तानचा झेंडा फडकावणे आणि भारत विरोधी घोषणा देण्याच्या आरोपात फुटीरतावादी नेता मसरत आलमच्या अटकेनंतर जम्मू-काश्मीरमधील इतर फुटीरतावादी नेत्यांनी मोर्चा उघडला आहे. शुक्रवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारुख यांच्या नेतृत्वात विरोध प्रदर्शन करण्यात आले. विरोधी आंदोलन करणाऱ्यांनी त्राल येथील मध्यवर्ती ठिकाणाहून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिस आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रुधूराचे नळकांडे फोडावे लागले. यात 14 जण जखमी झाले.
मसरतच्या अटकेनंतर सैय्यद अली शाह गिलानी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे दोघे त्राल येथील विरोध प्रदर्शनात सहभागी होणार होते. सोमवारी त्राल येथील चकमकीत दोन जण ठार झाले होते. स्थानिक नागरिकांचा दावा आहे, की लष्कराच्या जवानांनी बनावट एन्काउंटरमध्ये दोन जणांना ठार केले. त्याविरोधातच आज (शुक्रवार) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मीरवाइज म्हणाले, पीडीपीने भाजपसमोर गुडघे टेकले
हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाइज उमर फारुख म्हणाले, पीडीपी सरकारने भाजपसमोर गुडघे टेकले आहेत. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्टमुळे ( AFSPA) निरपराध मारले जात आहेत. हा कायदा संपवण्याची आता वेळ आली आहे. सोमवारी झालेले एन्काउंटर बनावट होते. या प्रकरणात एकालाही अटक झालेली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. या चकमकीची चौकशी होण्याची गरज आहे. दरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीवर भाजप महासचिव राम माधव म्हणाले, 'हा कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. राज्य सरकार दोषींवर योग्य कारवाई करेल.'
पुढील स्लाइडमध्ये फोटोतून पाहा, त्राल येथील पोलिस आणि आंदोलकांमधील चकमक