आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला आठवत नाही मी येथे आले होते - हनीप्रीत, भटिंडाला नेऊन अडीच तास चालली प्रश्नोत्तरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड/भटिंडा - डेरा सच्चा सौदा प्रमुख गरुमीत राम रहिमची मानसकन्या हनीप्रीत आणि तिची सहकारी सुखदीप कौरला गुरुवारी भटिंडाला नेण्यात आले. येथे पोलिसांनी तिची अर्धातास चौकशी केली. त्यानंतर हरियाणा पोलिस तिला सुखदीप कौरच्या घरी घेऊन गेले, येथे ती चार दिवस मुक्कामाला होता. येथे पोलिसांनी दोन तास तिला विविध प्रश्न विचारले. त्यावर तिचे एकच पालूपद होते, माला आठवत नाही की मी येथे आले होते की नाही? पोलिसांची प्रश्नांची सरबत्ती सुरु असताना हनीप्रीत वारंवार पाणी मागत होती आणि घाम पुसत होती. 39 दिवस फरार हनीप्रीतला मंगळवारी पंजाबातून अटक करण्यात आली होती. बुधवारी तिला पंचकुला कोर्टाने तिला 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 
 
बसने घेऊन गेले पोलिस 
- गुरुवारी सकाळी हरियाणा पोलिस हनीप्रीत आणि तिची सहकारी सुखदीप हिला पंचकुला सेक्टर-23 च्या पोलिस स्टेशनमधून सेक्टर-20 पोलिस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर तिला बसने भटिंडाला नेण्यात आले. हनीप्रीतला पाहाण्यासाठी ठिकठिकाणी लोक गर्दी करत होते. 
- दुसरीकडे, हनीप्रीतवरुन राजकीय वातावरणही तापले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, 'हनीप्रीत फरार होती, त्या काळात ती कुठे होती हे पंजाब पोलिसांना माहित होते.'
 
हनीप्रीतला भटिंडाला का नेले? 
- पोलिसांचा अंदाज आहे की हनीप्रीत फरार होती तेव्हा ती बहुतेक काळ पंजाबातील मालवा येथे लपून बसली होती. 39 दिवसांमधील बहुतेक दिवस ती भटिंडामध्ये होती. येथे सुखदीप कौर तिच्या मदतीला होती.
- पोलिसांच्या तपासात समोर आले की 4 दिवस सुखदीप कौरच हनीप्रीतची गाडी चालवत होती. चंदीगडच्या आसपासच्या परिसरात तीन ठिकाणी या दोघींनी सोबतच मुक्काम केला होता. 
 
हनीप्रीतने 39 दिवसांत वापरले 17 सीम 
- सूत्रांच्या माहितीनुसार, हनीप्रीतने 39 दिवसांमध्ये 17 सीमकार्डचा वापर केला. यातील तीन इंटरनॅशनल सीम होते. या दरम्यान ती अनेक लोकांच्या संपर्कात होती. 
- पंचकुलाचे एसीपी मुकेश म्हणाले, हनीप्रीतने पंचकुलामध्ये दंगल भडकवण्याचा आरोप अजून स्वीकारलेला नाही. त्यामुळे तिची लायडिटेक्टर टेस्ट घेण्यासाठी कोर्टाला परवानगी मागितली जाणार आहे.    
बातम्या आणखी आहेत...