आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटण्यात अतिक्रमण हटाव पथकावर दगडफेक; 3 JCB, पोलिसांची वाहने आगीच्या भक्षस्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहार सरकारने जमीन हाऊसिंग बोर्डला दिली, मात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रांशिवाय जमीनीची विक्री केली. - Divya Marathi
बिहार सरकारने जमीन हाऊसिंग बोर्डला दिली, मात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रांशिवाय जमीनीची विक्री केली.
पाटणा - अतिक्रमण हटाव पथकावर मंगळवारी येथील राजीवनगरच्या घोडदौड रोडवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत एक पोलिस अधिकाऱ्यासह 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. हजारो लोकांनी हल्लाबोल केल्यानंतर अतिक्रमण हटाव पथकासह पोलिसांना आल्या पावली परत फिरावे लागले. त्यानंतर संतप्त जमावाने 3 जेसीबी आणि पोलिसांची वाहने आगीच्या भक्षस्थानी दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 40 राऊंड फायर केले. 
 
काय आहे प्रकरण 
- राजीवनगरच्या घोडदौड मार्गावरील वादग्रस्त भूखंड रिकामा करण्यासाठी हाऊसिंग बोर्डच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिस गेले होते. 
- 1974 मध्ये राज्य सरकारने राजीवनगरची 1024 एकर जमीन शेतकऱ्यांकडून घेऊन हाऊसिंग बोर्डला देण्याचा निर्णय केला होता. 
- सरकारने जमीन हाऊसिंग बोर्डाच्या नाववर करुन दिली मात्र, स्थानिकांचे म्हणणे आहे की त्यांना याचा कोणताही मोबदला मिळाला नाही. 
- जमीनीचा मोबदला मिळाल नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जमीनीवर आपला ताबा कायम ठेवलदा, दरम्यानच्या काळात येथे अनेक अवैध बांधकामे होत राहिली. 
- शेतकऱ्यांनी कागद पत्रांशिवाय जमीनीचे तुकडे पाडून ती विकायला सुरुवात केली आणि लोकांनी त्यावर घरे बांधली. 
 
जेसीबी सोडून पळाला ड्रायव्हर, पोलिसांची हवेत फायरिंग 
- हाऊसिंग बोर्डचे अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांना सोबत घेऊन गेले. जेसीबीने एक भिंत तोडताच लोकांनी दगडफेक सुरु केली. 
- हजारोंच्या जमावाने पोलिस पथक आणि जेसीबीवर दगडफेक सुरु केली. त्यानंतर जेसीबी ड्रायव्हरने तिथून पळ काढला. 
- संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत 40 राऊंड फायर केले, मात्र तरीही जमाव शांत झाला नाही. त्यांनी तीन जेसीबीसह पोलिसांची वाहने पेटवून दिली. 
- प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दगडफेक करण्यात महिला आघाडीवर होत्या.
बातम्या आणखी आहेत...