आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भर रस्त्यावर पोलिसांकडून युवकाला मारहाण, पत्नी करत होती मदतीची याचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस निरीक्षक युवकाला मारहाण करताना - Divya Marathi
पोलिस निरीक्षक युवकाला मारहाण करताना
पूर्णिया (बिहार) - जिल्ह्यातील जलालगड येथे एका दाम्पत्याला करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भर रस्त्यावर मारहाण गुंड करत नसून पोलिस करत आहेत. युवकाला मारहाण होत असताना त्याची पत्नी मदतीची याचना करते मात्र कोणीही पुढे आलेले या व्हिडिओत दिसत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अजब स्पष्टीकरण दिले आहे. युवक आत्मदहनाचा प्रयत्न करत होता, आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण
जलालगड पोलिस स्टेशन हद्दीतील दनसार येथील राजीवकुमार याचा जमीनीवर काही गुंडांनी अनधिकृत ताबा घेतला आहे. याची तक्रार करण्यासाठी राजीव त्याच्या पत्नीसह जलालगड पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. मात्र पोलिसांनी गुंडांवर कारवाई करण्याऐवजी राजीवकुमारला त्या लोकांच्या नादी लागू नको असे बजावले आणि काढून दिले. राजीव कारवाईवर अडून बसल्यानंतर पोलिस निरीक्षक गणेशकुमारने पोलिस स्टेशन बाहेर नेऊन त्याला मारझोड सुरु केली. यावेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यात दिसत आहे, की युवकाची पत्नी मदतीसाठी सर्वांना याचना करते मात्र तिला बाजूला करुन युवकाला बेदम चोप देण्यात येत आहे.

पोलिस काय म्हणाले
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजीवकुमार आत्मदहनाचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याला रोखल्याचे सांगत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटो आणि व्हिडिओ