आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Policemen Burnt Alive Journalist Mother In UP For Opposing Molestation

UP : महिलेचा आरोप - पोलिसांकडून बलात्काराचा प्रयत्न, जिवंत जाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाराबंकी / लखनौ - उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील पोलिस स्टेशनमध्ये कथितरित्या जाळण्यात आलेल्या एका महिलेने मृत्य़ूपूर्व जबाबात स्टेशन ऑफिसर आणि उप निरीक्षकाने बलात्काराचा प्रयत्न आणि दागिने लूटल्याचा आरोप केला आहे. 70 टक्के जळालेल्या या महिलेचा मंगळवारी पाहाटे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला तातडीने लखनौला हलवण्याच्या सूचना डॉक्टरांनी केली आणि लखनौमध्ये उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी न्यायालयिन चौकशीचे आदेश दिले आहेत. महिलेचा मुलगा एका हिंदी दैनिकात बातमीदार आहे.
काय आहे प्रकरण
पोलिसांवर बलात्काराचा आरोप करणारी मृत महिला नीतू अंगणवाडी कर्मचारी होती. लहान मुलांना शिकवणे आणि त्यांच्या पोषण आहाराची काळजी घेण्याचे महिलेचे काम होते. महिलेचा आरोप होता, की कोठी पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार रायसिंह यादव आणि पोलिस उपनिरीक्षक अखिलेश यांची तिच्यावर वाईट नजर होती. महिला रस्त्याने जात असताना दोघेही तिच्यावर अभद्र कॉमेंट्स करत होते. रविवारी पोलिसांनी तिच्या पतीला एका बनावट प्रकरणात गोवून अटक केली होती. महिला पतीला सोडवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. तिच्या अंगावरील दागिणे लूटले आणि बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने त्यांना कडाडून विरोध केल्यानंतर त्यांनी तिला पेटवून दिले.
पुढील स्लाइडमध्ये, घटनेशी संबंधित छायाचित्रे