आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षांनंतर देशात पुन्हा आढळला पोलिओ विषाणू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात पोलिओच्या विषाणूचा पुन्हा एकदा संसर्ग होऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांना हैदराबादेत रेल्वे स्टेशनजवळ व्हॅक्सिन डिराईव्हड पोलिओ व्हायरस (व्हीडीपीव्ही) आढळून आला आहे. या विषाणूचा सर्वात मोठा धोका म्हणजे देशातील कोणत्याही भागातील मुलांमध्ये पोलिओचे संक्रमण होऊ शकते, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. अर्थात पाण्यात आढळलेल्या या विषाणूमुळे स्थानिक मुलांमध्ये पोलिओचे कुठलेही संक्रमण अद्याप तरी आढळलेले नाही. परंतु हा विषाणू इतर कुठल्या राज्यात पसरून त्याने नवे रुग्ण तयार करू नयेत म्हणून विशेष खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भारतात २०१० पासून पोलिओचा विषाणू सर्वसामान्य वातावरणात आढळलेला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने २०१३ मध्ये भारताला पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात आमच्या शास्त्रज्ञांना पोलिओच्या विषाणूंची तपासणी करत असताना हैदराबादेत रेल्वे स्टेशनजवळ पाण्यात व्हीडीपीव्ही पोलओचे नमुने आढळले आहेत. पोलओचा हा घात विषाणू आढळलया नंतर आरोग्य मंत्रालयाने तातडीने त्या परिसरात एक पथक रवाना केले आहे. प्राथमिक तपासणीत हा विषाणू हैदराबादेत अन्यत्र पसरला नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु तो इतर राज्यांत पसरू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना सतावत आहे.

विषाणू आढळून आल्यानंतर हैदराबादेत तातडीने पाच वर्षांखालील सर्व मुलांना पुन्हा एकदा पोलिओची लस पाजवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासोबत या परिसरात सर्व मुलांच्या विष्ठेचे नमुने घेऊन ते तपासून अहवाल तयार करण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

निष्काळजीपणा नको
आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल हेल्थचे संस्थापक डॉ. बाबी जॉन यांच्या मते भारतीय वातावरणातून पोलिओ २०१० मध्ये पूर्णपणे नष्ट झाला होता. परंतु देशात अजूनही प्रत्येक एक लाख मुलांमागे एकाला डिराइव्ह व्हॅक्सिन पोलिओ विषाणूचे संक्रमण होत आहे. अशा स्थितीत पाण्यामध्ये हा विषाणू आढळणे म्हणजे इतर मुलांनाही त्याची लागण हाेण्याचा धोका आहे. त्यामुळे शून्य ते पाच वर्षांखालील मुलांना लसीकरणात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला जाऊ नये.

२०१० पासून विषाणू नाही
प्रकरणाशीसंबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, २०१० मध्ये भारतीय वातावरणात पोलिओचा व्हीडीपीव्ही हा घातक विषाणू आढळला होता. परंतु पोलिओचे संक्रमण संपल्यानंतर कोठेही त्याचे नमुने आढळून आलेले नव्हते. त्यामुळे सहा वर्षांनी तसे नमुने सापडल्याने आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढली आहे. आम्ही पोलिओच्या सर्व पथकांना पुन्हा अलर्ट जारी करून सर्व राज्यांमध्येही नव्याने पोलिओ लसीकरणची मोहिम नव्याने हाती घेण्याबाबत विचार करत आहोत. त्यामुळे त्याचा धोका कमी करण्यास मदत होईल. परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येत नाही तोवर आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहोत.
बातम्या आणखी आहेत...